गुढीपाडव्याचा मुहूर्त, स्वाभिमानीची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकांचं टार्गेट, काय म्हणाले राजू शेट्टी?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडव्याच्या मुहूर्तावर स्वाभिमानी शेतकरी संघटणेने मोठी घोषणा केली आहे. राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

गुढीपाडव्याचा मुहूर्त, स्वाभिमानीची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकांचं टार्गेट, काय म्हणाले राजू शेट्टी?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 11:41 AM

कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा आणि विधानसभेला जवळपास दोन वर्षे बाकी आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करत असतांना राजू शेट्टी यांनी मुहूर्त बघून घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शड्डू ठोकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले सह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी आज केली आहे.

शेतकरी प्रश्नांना घेऊन राजकरणार करणारे माजी खासदार राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदार संघात पराभव झाला होता. राजू शेट्टी पुन्हा एकदा त्याच मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. याबाबतची तयारी देखील राजू शेट्टी यांची सुरू आहे.

लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढविण्यातबाबत लवकरच उमेदवारांची यादी ही जाहीर करणार असल्याचे म्हंटले आहे. आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

राजू शेट्टी यांनी निवडणूक लढण्याबाबत स्वतः प्रतिक्रिया देत निर्णय जाहीर केला आहे. हातकणंगलेसह इतर कुठल्या जागा आणि उमेदवार कोण असणार याबाबत स्पष्ट केले नसले तरी घोषणा केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यानिमित्ताने आनंदाचे वातावरण झाले आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी राजू शेट्टी यांच्यासोबत तेलंगणा येथील बीआरएस पक्षासोबत युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यात काही इतर घटक पक्षांनाही सहभागी करून तिसरी आघाडी केली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. या सर्व चर्चा निराधार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले होते.

दरम्यान यापूर्वी राजू शेट्टी यांनी 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र नंतरच्या काळात राजू शेट्टी यांनी पाठिंबा काढून घेतला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्यासंदर्भात सरकारच्या काही भूमिका पटत नसल्याने माघार घेतल्याचे बोलले जात होते.

राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन नेहमी आंदोलन करत असतात. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला धारेवर धरत असतात. त्यामुळे शेतकरी नेता म्हणून राजू शेट्टी यांची संपूर्ण राज्यात ओळखत आहे. यापूर्वी ते खासदार देखील राहिले असून विविध प्रश्न त्यांनी संसदेत मांडले होते.

त्यामुळे पुन्हा एकदा राजू शेट्टी खासदार होण्यासाठी प्रयत्नशील असतांना आणखी चार उमेदवार कोण असणार याकडे स्वाभिमानीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.