AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मंत्रीच छगन भुजबळ यांच्या विरोधात; भाजपच्या बड्या नेत्याने मागितला भुजबळांचा राजीनामा

BJP LEader on Chhagan Bhujbal Stand For OBC Reservation : भाजपच्या मंत्र्याचा छगन भुजबळांच्या भूमिकेला विरोध... भाजपच्या बड्या मंत्र्याने मागितला मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा. म्हणाले, 'या' सगळ्याची काहीही गरज नव्हती! तसंच मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी, असंही ते म्हणालेत. वाचा सविस्तर...

आता मंत्रीच छगन भुजबळ यांच्या विरोधात; भाजपच्या बड्या नेत्याने मागितला भुजबळांचा राजीनामा
| Updated on: Nov 29, 2023 | 12:37 PM
Share

भूषण पाटील, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 20 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भुजबळ घणाघाती टीका करताना दिसत आहेत. अशातच त्यांच्या या भूमिकेला काही नेत्यांनी विरोध केला आहे. आता तर भाजपचे वरिष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच छगन भुजबळ यांना घरचा आहेर दिला आहे.

“विनाकारण दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होतोय”

ओबीसींच्या हक्कांचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे. याची काहीच गरज नव्हती. विनाकारण दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु झाला आहे. हा वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत. नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

“भुजबळांनी राजीनामा द्यावा”

छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन निघावं. मंत्रिमंडळातून बाहेर येऊन मग ओबीसींच्या प्रश्नांवर बोलावं. सरकारमध्ये असताना अशी भूमिका घेणं योग्य नाही. यामुळे सरकारमध्ये एक वाक्यता नाही, असा संदेश जातो. सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर ते ओबीसींसाठी घेत असलेली भूमिका आणि त्यांच्या सुरु असलेल्या सभा याबाबत सरकारने विचार करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार केला पाहिजे, असं विखे पाटील म्हणालेत.

“मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी”

मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवरती शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्नही सुरू आहेत, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.