Kolhapur Lockdown | ठाणे, पुणे, सोलापूरनंतर कोल्हापुरात सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन, पालकमंत्री सतेज पाटलांची घोषणा

कोल्हापुरात सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

Kolhapur Lockdown | ठाणे, पुणे, सोलापूरनंतर कोल्हापुरात सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन, पालकमंत्री सतेज पाटलांची घोषणा
सतेज पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jul 17, 2020 | 7:51 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात सोमवारपासून (20 जुलै) सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित (Kolhapur Seven Days Lockdown) करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil) यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील ठाणे, पुणे-पिंपरी, पनवेल, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे (Kolhapur Seven Days Lockdown).

कोल्हापुरात येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 जुलैपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यान, सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.

 TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कोल्हापूरकरांना सतर्क राहण्याचे आवाहन 

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला (Kolhapur Seven Days Lockdown).

“कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वजण प्रयत्न करुया, कोरोना संकटाचा मुकाबला करुया”, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरकरांना केलं आहे.

कुठे-कुठे लॉकडाऊन?

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरसह आजपर्यंत ठाणे, पनवेल, नवी मुंबई, पुणे-पिंपरी-चिंचवड, रायगड, सोलापूर, बारामतीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Kolhapur Seven Days Lockdown

संबंधित बातम्या :

Raigad Lockdown | रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन, अदिती तटकरे यांची घोषणा

Pune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.