AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Konkan Railway: 27 तासानंतर कोकण रेल्वे सुरळीत, प्रवाशांना मोठा दिलासा

कोकण रेल्वेसेवा सुरळीत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 27 तासानंतर कोकण रेल्वे सुरळीत झाली आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजेपासून कोकण रेल्वे ठप्प होती. मात्र, रेल्वे रुळावरील दरड बाजूला करुन कोकण रेल्वे अखेर सुरु झाली आहे.

Konkan Railway: 27 तासानंतर कोकण रेल्वे सुरळीत, प्रवाशांना मोठा दिलासा
| Updated on: Jul 15, 2024 | 8:44 PM
Share

रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ठप्प असलेली कोकण रेल्वेची वाहूतक अखेर सुरु झाली आहे. 27 तासानंतर कोकण रेल्वे सुरु झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्यानंतर मांडवी एक्स्प्रेस गोव्याकडे रवाना झाली आहे. कोकण रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांसाठी प्रशासनाकडून चिपळूण, कणकवली आणि रत्नागिरी स्थानकावरुन बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांनी अगोदर बसेसच्या माध्यमातून घरची वाट धरल्याचं पाहायला मिळालं. तर काही प्रवासी रेल्वे स्थानकांवरच अडकल्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.

रेल्वे रुळावर दरड कोसळ्यामुळे कोकणातील रेल्वेसेवा ठप्प होती. रेल्वे रुळावरील दगड आणि मातील बाजूला काढण्यात आले. 3 जेसीबी आणि 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रेल्वे रुळावरील दगड आणि माती बाजूला करण्यात आली. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून रेल्वे रुळाची पाहणी करण्यात आली. रेल्वे रुळाची पाहणी केल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली.

खेडच्या दिवाणखवटी आणि विन्हेरे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं संपूर्ण कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे जनशताब्दी आणि तुतारी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावर खोळंबल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. दरम्यान 27 तासांनंतर कोकण रेल्वेसेवा सुरळीत झाल्यानंतर प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे.

खेडमध्ये स्टेशनं मास्तराच्या केबिनमध्येच प्रवासी घुसले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. रेल्वेकडून काहीच सांगितले जात नसल्याने लोकांचा संताप अनावर झाला होता. चिपळूणला एक्सप्रेस 18 तास थांबली तरी देखील प्रवाशांना कसली सुविधा नव्हती. जेवण, पाणी मिळालं नाही त्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला. कोचुवेल्ली श्रीगांगनगर रेल्वेच्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्याच ऑफिसमध्ये धाव घेतली. यावेळी रेल्वेने पुढील एक तास ही गाडी खेड स्थानकात थांबेल असे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह खेड पोलिसांनी रेल्वे स्थानकात धाव घेतली.

कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दगड कोसल्याने कोकण रेल्वेची सेवा ठप्प झाली होती. कोकणात रत्नागिरी आणि चिपळूनला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे बऱ्याचदा दरड कोसळल्याने विस्कळीत झाली आहे.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.