
महापालिका निवडणुकींसाठी उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यावर आणि अर्ज मागे घेण्यााची मुदत संपल्यावर कोल्हापूरमध्ये (olhapur municipal corporation elections) सुरू झाला तो प्रचाराचा झंझवात. प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांसाठी अगदी झोकून देऊन प्रचार सुरू केला आणि सर्वच नेतेमंडळी आपल्या पक्षाचा सत्तेचा झेंडा महापालिकेवर फडकविण्यासाठी आतूर झाल्याचे दिसून आलं. गेलं 10 दिवस सुरू असलेला प्रचाराचा धडाका अखेर 2 दिवसांपूर्वी संपला, काल मतदानही मोठ्या प्रमाणात पार पडलं आणि आता आज प्रतीक्षा आहे ती अंतिम निकालाची. दूरवर पसरलेल्या कोल्हापूराची व्याप्ती आणि आवाका प्रचंड असून येथे कोणत्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतात, तेच महापालिकेवर विजयाचा ध्वज उभारणा आहेत.
इतर प्रभागांप्रमाणेच 16 आणि 17मध्येही जोरदार प्रचार, सभा, घरोघरी जाऊन मतदानाचे केलेले आवाहन वगैरे सर्व पार पडले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदानाचे कर्तव्यही बजावले. आता प्रभाग 16 आणि 17 चं चित्र थोड्याच वेळात स्पष्च होणार असून त्यापूर्वी इथली परिस्थिती, व्याप्ती, हा भाग कुठवर पसरलाय ते सविस्तर जाणून घेऊया.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 16
प्रभाग क्रमांक 16 ची एकूण लोकसंख्या आहे 26669 इतकी, त्यात अनुसूचित जातीचे 1952 तर अनुसूचित जमातीचे 140 मतदार आहेत. राजारामपुरी एक्स्टेंशन परिसर, कोरगावकर हाऊसिंग सोसायटी परिसरापासून ते राजारामा कॉलेज परिसरापर्यंत, अशी मोठी व्याप्ती या प्रभागाची आहे. यंदा मतदारसंघ मोठा झाला असून पूर्वीच्या 1 नगरसेवकाच्या जागी आता 4 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत.
उत्तरेला ताराराणी विद्यापीठ पूर्व बाजू ते मिलिटरी हद्दीने टेंबलाइ टेलिफोनपर्यंत, तर पूर्वेस बीएसएनएल टॉवरपासून ते के एसबी चौकापर्यंत हा प्रभाग आहे. दक्षिणेला हा भाग केएबी चौकापासून ते पश्चिमेस कन्हैय्या सर्व्हिसिंग सेंटरपर्यंत आहे. आणि पश्चिमेस तो प्रभाग त्या सर्व्हिस सेंटरपासून सुरू होतो ते दक्षिण पूर्व बाजू राजाराम पुरी 5 वी गल्लीपर्यंत पसरला आहे. यंदा इथे कोणकोणत्या पक्षाच 4 नगरसेवक येतात हे पाहण्यात कोल्हापूरवासियांचे लक्ष एकवटले आहे.
प्रभाग क्रमांक 17
27 हजार 262 अशी एकूण लोकसंख्या असलेल्या कोल्हापूरमधील प्रभाग क्रमांक 17मध्ये अनुसूचित जातीचे 5886 तर अनुसूचित जमातीचे 182 इतके मतदार आहेत. इथेही चार नगरसेवक निवडून द्यायची जबाबदारी असून हा प्रभाग टेंबलाईवाडी उड्डाणपूल झोपडपट्टी हॉटेल इलिगंट समोरील भाग, जादववाडी विक्रमनगर पासून शांति निकेतन परिसरापर्यंत असा पसरलेला आहे.
उत्तर – टेंबलाई उड्डाणपूलापासून ते पूर्वेस मनपा हद्दीपर्यंत, तर पूर्वेस – रेल्वे लाइनपासून दक्षिणेस मनपा हद्दीने राजाराम तलाव शिवाजी विद्यापीठ मुख्य रस्त्याने चित्रनगरी रोडपर्यंत आहे.
दक्षिणेला चित्रनगरी रास्ता मनपा हद्दीने मोरेवाडी रोड नाला हद्दीपर्यंत तर पश्चिमेला नायरा पेट्रोल पंपापुढील व नाला हद्दीपासून ते उत्तरेस शिवाजी विद्यापीठ मुख्य रस्त्यापर्यंत मतदारसंघ पसरलेला आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE