
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होऊन प्रचार, सभा, सर्व पार पडलं. काल महापालिकांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात मतदानही झाली. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडस राज्यातील महत्वाचया महापालिकांच्या निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठही काल मतदान पार पडलं असून करवीर निवासी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. या निवडणुकीत पूर्वीप्रमाणे प्रत्येकी एकेक नगरसेवक नव्हे तर यंदा 4 नगरसेवत निवडून द्यायचे आहेत. त्यामुळो कोल्हापूरकरांनी काल सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावत आपापल्या पसंतीच्या उमेदवाराल भरघोस मतदान केलं.
आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात मतदानाचा निकाल लागण्यास सुरूवात होईल. तत्पूर्वी कोल्हापूरचा महत्वाचा भाग असलेला प्रभाग 19 आणि 20 यांची माहिती जाणून घेऊ.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 19
प्रभाग क्रमांक 19 मध्ये यंदा 27 हजार 983 इतके मतदार असून 4019 अनुसूचित जातीचे मतदार तर 128 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत. म्हाडा कॉलनी, ताराराणी कॉलनी, कळंबा फिल्टर हाऊस, बालाजी पार्क पासून ते कळंबा जेल परिसर, स्टेट बँक कॉलनी , तपोवन परिसर, जामसंडेकर नगर इथपर्यंत हा परिसर पसरलेला आहे.
उत्तरेला मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नाल्यावरील पुलापासून पश्चिमेस तपोवन पत संस्थेपर्यंत तर पूर्वेस जरनगर मुख्य रस्त्याने मनपा हद्दीपर्यंत हा परिसर आहे. तसेच दक्षिणेला जरनगर मुख्य र्ता मनपा हद्दीपासून दक्षिणेस नरके मळा हद्दीने मनपा हद्दीपर्यंत आणि पश्चिमेला तपोवन पतसंस्था जुनी मोरे कॉलनी तेथून दक्षिणेस मनपा हद्दीने कळंबा तलाव उत्तर बाजू मनपा हद्दीपर्यंत प्रभाग क्रमांक 19 परसला आहे. उथे आता विजयाचं कमळ फुलतं की धनुष्यबाण, घड्याळ,
प्रभाग क्रमांक 20
कोल्हापूरमधला प्रभाग क्रमांक 20 म्हणजे गजबजलेला , वर्दळीचा भाग. इथे एकूण 32 हजार 121 मतदारांची संख्या असून 3497 अनुसूचित जातीचे तर 281 मतदान हे अनुसूचित जमातीचे आहेत. नवनाथ नगर, सुर्वे नगर,
प्रथमेश नगर, साळोखे नगर पासून पसरलेला हा भाग जिवबा नाना पार्क, महालक्ष्मी कॉलनी, बुद्धीहाळकर पाटील नगर परिसरापर्यंत आहे, एवढी त्याची व्याप्ती आहे.
उत्तरेला राजलक्ष्मी नगर नाल्यापासून पश्चिमेस दिप्ती पार्क अपार्टमेंटसमोरील राधानगरी ते रिंग रोडने उत्तरेस रि स नं 1487 च्या उत्तर हद्दीने पश्चिमेस मनपा हद्दीपर्यंत हा भाग आहे. तसेच पूर्वेला कळंबा जेल उत्तर हद्दीपासून मुख्य रस्त्याने कळंबा ग्रामपंचायत पर्यंत तेथून पश्चिमेस कळंबा ग्रामपंचायतच्या जवळ महानगरपालिकेपर्यंत आहे.
दक्षिणेला कळंबा नाका महानगरपालिका हद्दीपासून पश्चिमेस मनपा हद्दीने जिवबा नाना पार्क दक्षिण बाजूने पुईखडी पंपिंग स्टेशनच्या दक्षिण हद्दीने राधानगरी रोडपर्यंत तेथून पश्चिमेस मनपा हद्दीने बालिंगा रि स नं 213 च्या दक्षिण हद्दीपर्यंत आहे.
आणि पश्चिमेला रि स नं 206 पश्चिम बाजू मनपा हद्दीपासून दक्षिणेस मनपा हद्दीने रि स नं 213 चे दक्षिण हद्दीपर्यंत इतका हा परिसर पसरलेला आहे.
आता 19 आणि 20 या दोन्ही प्रभागांमध्ये आता कोणत्या पक्षांचे नगरसेवक विजयाचा झेंडा फडकावून महानगरपालिकेत जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल. थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होऊन, आज दिवसभरात इथल्या निकालाचं चित्र नक्कीच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE