AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणालच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, डोंगरावरून पडून आई-वडिलांचा मृत्यू, आता मोठ्या भावाबद्दल धक्कादायक माहिती समोर

छत्रपती संभाजीनगरमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता या घटनेतील मृत तरुण कुणाल चांदवडे याच्या भावाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुणालच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, डोंगरावरून पडून आई-वडिलांचा मृत्यू, आता मोठ्या भावाबद्दल धक्कादायक माहिती समोर
kunal ChandvadeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 22, 2026 | 2:03 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हादरून सोडणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. वडिलांसोबत झालेल्या वादानंतर कुणाल चांदवडे नावाचा तरुण शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर आत्महत्येच्या उद्देशानं गेला. त्यानंतर त्याच्यापाठोपाठ त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगिता चांदवडे हे दोघेही गेले. कुणाल हा डोंगराच्या टोकावर उभा होता, थोडा जरी धक्का लागला तर तो कधीही खाली कोसळू शकतो अशी पस्थिती होती. तो सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तब्बल तीन तास त्याचे आई-वडील त्याची समजूत घालत होते. परंतु तो काही ऐकण्यास तयार नव्हता.

दरम्यान या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला कळाल्यानंतर ते देखील घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांनी देखील घटनास्थळी गर्दी केली. जो तो आपल्या परीने कुणालची समजूत घालण्याचं काम करत होता. परंतु कुणाल कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थतीमध्ये नव्हता. तीन तास त्याची समजूत घालणं सुरूच होतं. अखेर वडिलांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी त्याने उडी मारली, त्याच्यासोबत त्याचे वडील देखील डोंगरावरून खाली कोसळले.

दरम्यान वडील आणि मुलगा आपल्या डोळ्यादेखील डोंगरावरून खाली कोसळला हा मानसिक धक्का त्याच्या आईला सहन झाला नाही, आणि त्याची आई संगिता चांदवडे यांनी देखील डोंगरावरून खाली उडी मारली क्षणात अख्ख कुटुंब संपलं. दरम्यान आता कुणाल यांच्या मोठ्या भावाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या मोठ्या भावाचं आजारपणामुळे आकाली निधन झालं होतं, त्यानंतर आता कुणाल याने देखील आपल्या आयुष्याचा शेवट केला.  कुणाल याचे वडील ट्रक चालवायचे, ते अनेकदा कामानिमित्त बाहेरच असायचे, मात्र घरात मुलगा आणि वडिलांचं पटत नव्हतं, त्यांच्यामध्ये सातत्याने खटके उडायचे अशी माहिती देखील आता समोर येत आहे. काल देखील असाच वाद झाला असावा, आणि रागाच्या भरात कुणालने टोकाचं पाऊल उचललं असावं अशी देखील चर्चा सुरू आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?