Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी, मुख्यमंत्री फडणवीसांची आता थेट मोठी घोषणा

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी, मुख्यमंत्री फडणवीसांची आता थेट मोठी घोषणा
लाडकी बहीण योजना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2025 | 3:51 PM

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान ही योजना सुरू करताना काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या, मात्र अनेक ठिकाणी या योजनेसाठी पात्र नसलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं दिसून आलं आहे. अशा पात्र नसलेल्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना या योजनेतून आतापर्यंत वगळण्यात देखील आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे या योजनेचा लाभ हा खऱ्या लाभार्थी महिलांनाच मिळावा यासाठी आता सरकारकडून या योजनेसाठी केवायसी सुरु करण्यात आली आहे, या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करणं बंधनकारक असून, केवायसी न केल्यास या महिलांना मिळणारा निधी थांबवला जाण्याची शक्यता आहे. आधी केवायसीची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबरपर्यंत होती, त्यामध्ये आता मुदतवाढ करण्यात आली असून,  या योजनेच्या लाभार्थी महिलांना आता  31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करता येणार आहे,

आता या योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे, अनेकदा ही योजना बंद होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे, याला उत्तर देताना वाशिममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट मोठी घोषणा केली आहे. विरोधक म्हणत होते लाडकी बहीण योजना आता बंद होईल, मात्र एक वर्ष पूर्ण झालं आणि जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना  सुरूच राहणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर  लाडक्या बहिणी आता केवळ लाडक्या बहिणी राहणार नाही तर त्या लखपती दीदी बनणार आहेत. आम्ही आत्तापर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार केल्या आहेत, आणखी 50 लाख लखपती दिली तयार करायच्या  आहेत, अशी मोठी घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.