AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेंकडून गुडन्यूज, योजनेबाबत दिली सर्वात महत्त्वाची माहिती

लाडकी बहीण या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण पाच हप्ते जमा झाले आहेत. आता डिसेंबरचा हफ्त कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेंकडून गुडन्यूज, योजनेबाबत दिली सर्वात महत्त्वाची माहिती
| Updated on: Dec 21, 2024 | 8:12 PM
Share

राज्यातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांसह सर्वांचं लक्ष डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लागलं आहे.

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आम्ही महिलांना 2 हजार 100 रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2 हजार 100 रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील सर्वांचच लक्ष लागलं आहे. मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपयेच जमा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2 हजार 100 रुपये मिळू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे, डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.  दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. त्यामुळे आता  लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?