AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचं मानधन 1500 रुपयांवरून 3000 करणं शक्य, सत्ताधारी आमदाराने दिला फॉर्म्युला

लाडक्या बहि‍णींचं मानधन 1500 रुपयांवरून 3000 करणं शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी सत्ताधारी आमदाराने मुख्यमंत्री फडणवीसंना फॉर्म्युला देखील दिला..

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचं मानधन 1500 रुपयांवरून 3000 करणं शक्य, सत्ताधारी आमदाराने दिला फॉर्म्युला
Ladki bahin yojan Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 2:34 PM
Share

लाडकी बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहि‍णींना आनंद देणारी बातमी हाती आली आहे. सत्ताधारी आमदाराने लाडकींचे मानधन 1500 रुपयांवरून थेट 3000 रुपये करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आमदारांचे पगार कमी करून लाडक्या बहि‍णींच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली. रवी राणा यांनी केलेल्या मागणीची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली आहे.

रक्षाबंधनाचं औचित्य साधून सरकारने लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा दिला. राज्यातील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहि‍णींना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला. हा निधी महिला आणि बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर लाडकींचा जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.  आता लाडक्या बहि‍णींना पंधराशे रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदारांचे पगार कमी करा पण लाडक्या बहिणींचे पंधराशे वरून तीन हजार रुपये करा, अशी मागणी रवी राणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. आमदार रवी राणा यांना अमरावतीत मोठ्या संख्येने महिलांनी बांधल्या. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलानवर रवी राणा काय म्हणाले?

अमरावतीवरून यवतमाळ येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या घराकडे निघालेल्या विद्यार्थ्यांनी परत यावं, अशी विनंती रवी राणा यांनी आंदोलकांना केली. 7 सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत विद्यार्थ्यांची बैठक होणार आहे. सात तारखेला विद्यार्थ्यांसोबत बैठक आहे. या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाहीतर मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करेल, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्या पत्रं दिलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पत्राचा मान ठेवावा आणि आंदोलन मागे घ्यावं. दुसरीकडे विद्यार्थी मात्र मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळच्या दिशेने कूच करत आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ