AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’वर घोंगावतंय नवं संकट, 29 हजार महिला..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या eKYC ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. पण अमरावती जिल्ह्यात २९ हजारांहून अधिक महिला तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे मासिक १५०० रुपये थांबले आहेत. ही प्रक्रिया पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ देण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक आहे, पण आता अनेक बहिणींना नवीन संकटाचा सामना करावा लागतोय.

Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'वर घोंगावतंय नवं संकट,  29 हजार महिला..
'लाडक्या बहिणीं'वर नवं संकट ?Image Credit source: social media
| Updated on: Nov 21, 2025 | 2:50 PM
Share

Ladki Bahin Yojana ekyc : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया बंधकारक करण्यात आली होती. नोव्हेंबरची मुदत वाढवून आता 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. ekyc या प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता येईल. पात्र लाभार्थ्यांनाच नियमितपणे मासिक 1500 रुपयांचा हप्ता मिळेल,असे सांगण्यात आले होते.मात्र आता याच संदर्भात एक नवी माहिती समोर आली असून लाडक्या बहिणींवर नवं संकट घोंगावताना दिसत आहे. जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील अडीच कोटींपेक्षाा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल होता. त्यांच्या खात्यात दरमहिन्याला 1500 रुपये जमा होतात, मात्र आता सरकारने छाननी सुरू केली असून लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.

18 नोव्हेंबरला ई-केवायसीची मुदत संपणार होती, मात्र लाखो महिलांची ही प्रक्रिया काही कारणांमुळे पूर्ण न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली. त्यानुसार आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत लाडक्या बहिणीनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर मात्र ही मुदत संपेल.

अमरावती जिल्ह्यातल्या हजारो बहिणी संकटात

मात्र आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अमरवाती मधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील 29 हजार 106 महिला संकटात सापडल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे, तांत्रिक तपासणीत त्या अपात्र ठरल्या असून, त्यामुळेच त्यांना मिळणारे दीड हजार रुपये बंद झाले आहेत. ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांची नावं ही बालविकास विभागाने जाहीर केली आहेत. त्यांची पात्रता रद्द ठरण्यामागे काही कारणं आहेत, त्यामध्ये आर्थिक स्तर, आरोग्य, पोषण यांचा समावेश सून त्यामुळे या महिलांची पात्रता नाकारण्यात आली आहे. तसेच या महिलांच्या बँक खात्यातील व्यवहार व जोडलेली कागदपत्रे यांच्या तफावत दाखवत आहेत. त्यामुळे त्या महिला अप्ता ठरल्या आहेत. सध्या अमरावती जिल्ह्यात तब्बल 9 हजार महिलांच्या कागदपत्रांची तपासणी सुरूच आहे. 31 डिसेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आता या महिलांना मिळणारे 1500 रुपये अडकले असून त्यांना योजनेचा लाभ मिळणार का नाही, तो कधी मिळणार असे अनेक सवाल महिलांच्या मनात असून त्यांच्यावर हे नवं संकट घोंगावताना दिसत आहे.

ई-केवायसी म्हणजे काय ?

बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ladakibahin.maharashtra.gov.in हे स्वतंत्र संकेतस्थळ आहे. यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांना ईकेवायसी पूर्ण करता येईल.प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.