AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MukhyaMantri Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेत आता थेट कारवाई, या लोकांना बसणार मोठा दणका, तुम्ही यात आहात का?

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला असून त्यांना आता कारवाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषदांना यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. योजनेचा उद्देश गरिब महिलांना मदत करणे असतानाच, अनेकांनी या योजनेचा चुकीचा उपयोग केला आहे.

MukhyaMantri Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेत आता थेट कारवाई, या लोकांना बसणार मोठा दणका, तुम्ही यात आहात का?
लाडकी बहीण योजनेत थेट कारवाईImage Credit source: social media
| Updated on: Aug 21, 2025 | 9:46 AM
Share

गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. विधानसभा निवडणूकीच्या आधी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत निकषात बसणाऱ्या, 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिुले जातात. गेल्या वर्षभरात कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी त्याचत अनेक गैरप्रकार झाल्याचेही समोर आले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये काम करून, 6व्या व 7 व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते. असे गैरप्रकार करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असून त्यांना चांगलाच दट्ट्या बसणार आहे.

मिळालेल्या माहिताीनुसार, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या, पैसे लाटणाऱ्या 1 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास खात्याने आता ग्रामविकास खात्याकडे पाठवली आहे. त्यानतंर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी (सीईओ) परिपत्रक काढले असून योजनेचा गैरफायदा घेऊन पैस लाटणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई ककरावी, असे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : आयत्या बिळावर नागोबा..2 हजारांपेक्षा जास्त महिला लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, गलेलठ्ठ पगार मिळवूनही दीड हजारांचा मोह सुटेना

अनेक महिलांनी लाटले कोट्यावधी रुपये

विधानसभा निवडणुकीपूर्वी काही काळ आधी, जुलै महिन्यात महायुती सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. मात्र गरीब महिलांना या योजनेचा लाभ व्हावा असा उद्देश असतानाही अनेक सरकारी कर्मचारी महिलांनीही या योजनेसाठी अर्ज करत पैसे लाटल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले होते. , 6व्या व 7 व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, तसेच गलेलठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटली नाही. ऐन निवडणुकीच्या धामधुनीत ही योजना जाहीर केल्याने त्या योजनेच्या योजनेत पडताळणीवर अधिक भर देण्यात आला नव्हता, त्यामुळे निकषात न बसणाऱ्या अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले होते.

गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाईचा दट्ट्या

फक्त सरकारी कर्मचारी महिलाच नव्हे तर अनेक पुरूषांनीही या योजनेचा अर्ज भरून ते पैसे घेतल्याचे समोर आले होते. यामुळे एकच गदारोळ माजला होता. योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने दिलेली ही यादी यादी महिला बालविकास विभागाने तात्काळ ग्रामविकास विभागाला पाठवूली असून आता त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे समजते. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश ग्रामविकास खात्याने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक पुरूषांनीही घेतला गैरफायदा

लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने योजनेतीला लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला होता. लाभार्थी महिलांच्या यादीत चक्क पुरूषांचीही नावे समोर आली होती. 14 हजारांपेक्षा अधिक पुरूषांची नावे त्या यादीत होती आणि त्यांनाही लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप झाल्याची माहिती देखील समोर आली होती. या पुरूषांनी सुमारे वर्षभर जे पैसे लाटले, सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित झाला होता.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.