लातूरच्या सृष्टीची आशिया बुकमध्ये नोंद, सलग 24 तास लावणी नृत्याचा विक्रम

नुकतंच आशिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या निरीक्षकांनी ही घोषणा केली आहे. (Latur Srushti Jagtap Lavni Dance Record In Asia Book)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:16 PM, 27 Jan 2021
लातूरच्या सृष्टीची आशिया बुकमध्ये नोंद, सलग 24 तास लावणी नृत्याचा विक्रम

लातूर : लातूरच्या सृष्टी जगताप हिने सलग 24 तास लावणी नृत्य करण्याचा विक्रम केला आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. नुकतंच आशिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या निरीक्षकांनी ही घोषणा केली आहे. (Latur Srushti Jagtap Lavni Dance Record In Asia Book)

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे काल (26 जानेवारी) संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान लावणी करण्यास सुरुवात केली. तिने 27 जानेवारी संध्याकाळी 4.30 पर्यंत सलग लावणी नृत्य सादर केलं. लातूरच्या दयानंद सभागृहात तिने सलग 24 तास लावणी नृत्य सादर केले.

सृष्टी ही नववीत असून ती लातूरच्या पोद्दार स्कूलमध्ये शिकते. सृष्टीने लावणी सादर करतेवेळी प्रत्येक तासाला तीन मिनिटे ब्रेक घेतला. त्याशिवाय तिला काही त्रास होतो आहे का? याची दर दोन तासाला डॉक्टरांनी विचारपूस केली. मात्र तिने न थकता लावणी करण्याचा दृढ निश्चय केला होता. या निश्चयाप्रमाणे तिने हे लावणी नृत्य सादर केले.

सृष्टीचा हा विक्रम पाहण्यासाठी सभागृहात प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलग 24 तास नृत्य सादर करण्यासाठी सृष्टीने चार वेळा सराव केला होता.  (Latur Srushti Jagtap Lavni Dance Record In Asia Book)

संबंधित बातम्या : 

अभिमानास्पद… गडचिरोलीच्या 12 पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर

नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानात, तब्बल 18 वर्षे जेलमध्ये, 65 वर्षीय हसिना बेगम औरंगाबादेत परतल्या