AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला

नीट पेपरफुटी प्रकरणात संचालक तुरुंगात असतानाही, लातूरमधील 'आरसीसी' कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मोटेगावकरच्या क्लासचा एक विद्यार्थी लातूरमधून अव्वल ठरला, तर 500 हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरले. लातूर पॅटर्नने पेपरफुटीचा डाग पुसून काढत पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली.

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला
नीट परीक्षेत लातूरमध्ये मोटेगावकर क्लासचा विद्यार्थी पहिला
| Edited By: | Updated on: Jul 18, 2026 | 12:33 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणात ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे. मोटेगावकर याने पेपर फोडले असून त्यासाठी लाखो रुपयांची माया उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे मोटेगावरच्या क्लासच्या यशाचं बिंगही फुटलं. पेपर फोडून विद्यार्थ्यांना देत असल्यामुळेच मोटेगावकरची मुलं नीटमध्ये टॉपला येतात असं बोललं जात होतं. मात्र, काल लागलेल्या नीट परीक्षेत मोटेगावकरच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी घसघशीत मार्क्स मिळवले आहेत. मोटेगावकरच्या क्लासचा एक विद्यार्थी तर नीट परीक्षेत लातूरमध्ये टॉप ठरला आहे.

नीट परीक्षेचा काल निकाल जाहीर झालाय या निकालावर लातूर पॅटर्नची पुन्हा छाप पहायला मिळाली आहे. लातूर जिल्ह्यातून 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पात्र ठरतील असा हा निकाल आहे. या निकालातून लातूरच्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटीमुळे झालेला बदनामीचा डाग पुसून काढला आहे. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे 400 पेक्षा जास्त विद्यार्थी नीट परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले आहेत. तर मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही चांगले यश संपादन केले आहे. RCC क्लासेसचे 500 पेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पात्र ठरतील, असा दावा करण्यात येतो आहे. विशेष म्हणजे 686 गुण घेऊन ऑल इंडिया 172 रँक गुण घेणारा विद्यार्थी हा मोटेगावकरच्या RCC क्लासेसचा आहे.

विद्यार्थी अव्वल

लातूर मधून 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस बरोबरच लातूरच्या तीन प्रमुख महाविद्यालयांमधून हे विद्यार्थी विशेष प्राविण्याने री-नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मोटेगावकर तुरूंगात असतानाही त्याच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहेत. लातूर मध्ये सर्वात जास्त 720 पैकी 686 गुण मिळवणारा विद्यार्थी हा मोटेगावकऱ्याच्या RCC क्लासेसचा आहे.

काय आहे प्रकरण?

नीट पेपर फुटल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा कसून तपास करण्यास सुरुवात केली होती. या पेपरफुटीचे धागेदोरे लातूरमध्ये असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे सीबीआयने कारवाई करण्यास सुरुवात केली. 15 मे रोजी सीबीआयने मोटेगावकरच्या घरी छापे मारून त्याची 9 तास चौकशी केली. या धाडीत सीबीआयने मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमधून सराव प्रश्नपत्रिका, मोबाईल आणि महत्त्वाचे डीजिटल पुरावे जप्त केले होते. त्यानंतर 17 मे रोजी सीबीआयने मोटेगावकरची पुण्यात 11 तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच मोटेगावकराच्या यशाच्या मंत्राच्या पॅटर्नवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार