Latur : …असा मिटला कुटुंबावरील बहिष्कार घटनेचा वाद, नेमकं काय घडलं ताडमुगळी गावात?

| Updated on: Feb 06, 2022 | 11:32 AM

ताडमुगळी गावामध्ये एका तरुणाने मंदिरात प्रवेश करुन नारळ वाढवला आणि दर्शन घेतले म्हणून संबंध गावाने तरुणाच्या कुटुंबियावर बहिष्कार टाकल्याची घटना घडली होती. त्यामुळे गावकऱ्यांच्या या भूमिकेवर संतप्त भावना व्यक्त होत असताना आता जिल्हा प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करीत वादावर पडदा टाकण्याचे काम केले आहे.

Latur : ...असा मिटला कुटुंबावरील बहिष्कार घटनेचा वाद, नेमकं काय घडलं ताडमुगळी गावात?
लातूर जिल्ह्यातील ताडमुगळी गावात एका कुटुंबियावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. अखेर प्रशासनाच्या भूमिकेमुळे वाद मिटला आहे
Follow us on

लातूर : पुरोगामी (Maharashtra) महाराष्ट्रात आजही जातीभेदाचे तेढ किती मोठ्या प्रमाणात आहे त्याचा नमुनाच (Social Media) सोशल मिडियाच्या माध्यमातून समोर आले होते. जिल्ह्यातील ताडमुगळी गावामध्ये एका तरुणाने मंदिरात प्रवेश करुन नारळ वाढवला आणि दर्शन घेतले म्हणून संबंध गावाने तरुणाच्या कुटुंबियावर (Boycott) बहिष्कार टाकल्याची घटना घडली होती. त्यामुळे गावकऱ्यांच्या या भूमिकेवर संतप्त भावना व्यक्त होत असताना आता जिल्हा प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करीत वादावर पडदा टाकण्याचे काम केले आहे. संबंधित कुटूंबावर तब्बल तीन दिवस बहिष्कार टाकल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, गावकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत असताना प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे आता या गावातील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. दोन्ही बाजूच्या लोकांनी आम्ही आता वाद करणार नाही, असा जवाब नोंदवला आहे.

नेमके काय होते प्रकरण?

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ताडमुगळी येथे एका दलीत समाजातील तरुणाने मंदिरात प्रवेश करुन दर्शन घेतले आणि नारळही वाढवला. मात्र, त्या तरुणाने मंदिरातच प्रवेश कसा केला अशी भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली. आजही ग्रामीण अशा घटानांना विरोध केला जात आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर तरुणाच्या कुटूंबियावर देखील बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यामुळे गावातील किराणा दुकाने, पीठ गिरणी हे देखील या एका कुटूंबासाठी बंद झाल्या होत्या. दरम्यान, दळणासाठी गेलेल्या महिलेला कसा विरोध केला जात आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला आणि अवघ्या काही तासांमध्ये ही घटना समोर आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करुन हे प्रकरण मिटवले आहे.

प्रशासनाच्या भूमिकेमुळे निघाला मार्ग

एकाच कुटूंबाला गावकऱ्यांनी वाळीत टाकल्याने त्यांना मुलभूत सोई-सुविधाही मिळेना झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात दळणासाठी गेलेल्या महिलेला कसा विरोध केला गेला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गाव गाठले व वादावर पडदा टाकला. दोन्ही बाजूच्या लोकांनी आता वाद करणार नाही असा जवाब दिला आहे. शिवाय गावातील व्यवहार आता सुरळीत झाले आहे. असा मतभद पुन्हा होऊ नये अशा सूचनाही उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Latur Video: शिक्षण पंढरी लातुरात दलितांवर बहिष्कार, मंदिरात नारळ फोडल्यानं गाव रागावलं, खाण्यापिण्यावरही संक्रात

Video | कुडाळच्या डबलबारीत वाजलं #Srivalli! श्रोते म्हणाले, वाह बुवा एक नंबर…

200ची पावती घेऊन 1200 वसूल करणाऱ्या लुटारी कर्मचाऱ्यांची अखेर बदली! शिस्तभंगाचीही कारवाई