Latur : लग्न जेवणातून वऱ्हाडी मंडळीला विषबाधा, भर उन्हामध्ये जेवणावळी अन् संध्याकाळी त्रास

रविवारी भर दुपारी लग्न सोहळा पार पडल्यानंतर वऱ्हाडी मंडळीच्या जेवणावळी उठल्या. त्या दरम्यान उन्हाचा पाराही चढलेलाच होता. लग्नासाठी केदारपूर काटेजवळगा, जवळगा ,अंबुलगा बु ,सिंदखेड यासह अनेक गावातून वऱ्हाडी लोक आले होते. पंगतीमधील ज्या नागरिकांनी वरण खाल्ले त्यांनाच पोटदुखी आणि उलटी याचा त्रास सुरु झाला होता.

Latur : लग्न जेवणातून वऱ्हाडी मंडळीला विषबाधा, भर उन्हामध्ये जेवणावळी अन् संध्याकाळी त्रास
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 3:15 PM

लातूर : (Nilanga) निलंगा तालुक्यातील केदारपूर येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न सोहळ्यातील जेवणातून विऱ्हाडी मंडळीला (Food Poisoning) अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून 100 नागरिकांवर निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु, देवणी तालुक्यातील वलांडी, जवळगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. केदारपूर येथील वधू आणि देवणी तालुक्यातील जवळगा साकोळा येथील वर यांच्या (Marriage Function) विवाह समारंभ पार पडल्यानंतर जेवणावळी उठल्यानंतर काही वेळाने हा प्रकार समोर आला आहे.

जेवणानंतर पोटदुखीचा त्रास

रविवारी भर दुपारी लग्न सोहळा पार पडल्यानंतर वऱ्हाडी मंडळीच्या जेवणावळी उठल्या. त्या दरम्यान उन्हाचा पाराही चढलेलाच होता. लग्नासाठी केदारपूर काटेजवळगा, जवळगा ,अंबुलगा बु ,सिंदखेड यासह अनेक गावातून वऱ्हाडी लोक आले होते. पंगतीमधील ज्या नागरिकांनी वरण खाल्ले त्यांनाच पोटदुखी आणि उलटी याचा त्रास सुरु झाला होता. पोट दुखणे ,उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णाची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यावर जेवणातूनच विषबाधा झाल्याचे समोर आले.

रुग्णांची संख्या जास्त मात्र सौम्य लक्षणे

केदारपूर येथील लग्न सोहळ्यात नागरिकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, जेवणातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच रुग्णांची संख्या ही वाढत गेली. अंबुलगा बु येथील केंद्रामध्ये 80 रुग्ण दाखल झाले होते. तर सोमावरपर्यंत 250 जणांची नोंदणी झाली होती. अजूनही यातील काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर काहींना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

वरण-भातावर ताव मारणाऱ्यांनाच अधिकचा त्रास

निलंगा तालुक्यातल्या आंबूलगा गावा जवळ असलेल्या केदारपूर इथं परवा एक लग्न होते,या लग्नात जेवण घेतल्या नंतर काही वेळाने अनेकांच्या पोटात दुखायला लागले, काहींना संडास उलट्याचा त्रास सुरू झाला. विशेष म्हणजे ज्यांनी भातावर वरण घेतले त्यांनाच हा त्रास जाणवला आहे.या विषबाधेमुळे कोणाचीही चिंताजनक प्रकृती नसून सर्वांना औषध उपचारा नंतर घरी पाठवण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.