Amit Deshmukh : सर्वात मोठी बातमी! भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर अमित देशमुख यांनी मौन सोडलं, म्हणाले….

राज्याच्या राजकारणात दिवसभर सुरु असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी मौन सोडलं आहे.

Amit Deshmukh : सर्वात मोठी बातमी! भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर अमित देशमुख यांनी मौन सोडलं, म्हणाले....
काँग्रेस नेते अमित देशमुखImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 11:09 PM

लातूर : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे पुत्र अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आज प्रचंड उधाण आलं. दिवसभर या विषयी चर्चा होती. लातूरचे भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकरांच्या (Sambhaji Patil Nilangekar) एका वक्तव्यानं त्याला आणखी बळ मिळालं. दिवसभर चालणाऱ्या या चर्चांनंतर आता अमित देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. “कितीही वादळं आली तरीही लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार”, असं अमित देशमुख यांनी भाजपला ठणकावलं आहे. अमित देशमुख यांच्या या विधानामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण संभाजी पाटील निलंगेकर यांचा रोख नेमका कुणाकडे होता? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे. दरम्यान, भाजप प्रवेशाच्या चर्चांवरुन अमित देशमुख यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे.

“अडीच वर्षात तीन सरकार बदलली, चौथं कधीही येऊ शकेल”, असं सूचक विधान अमित देशमुख यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

“अरे ही पाच वर्ष खरंच चमत्कारीच राहिली. आता जे सुरु आहे ना, ते तिसरं सरकार सुरु आहे. पहिलं अडीच दिवसांचं, दुसरं अडीच वर्षांचं, आणि आता हे तिसरं सुरु आहे. चौथं कधीही येऊ शकेल. काहीही सांगता येत नाही”, असा टोला अमित देशमुख यांनी लगावला.

“मला तुमच्या घरी या म्हणताय. तुम्ही स्वगृही यावं, असं जर मी म्हणालो तर तेच संयुक्तिक ठरेल”, असं प्रत्युत्तर अमित देशमुख यांनी दिलं.

“कितीही वादळं आली, किती वारे आले तरी वाडा तो तिथेच होतो. तसंच कितीही वादलं आली तरी लातूरता देशमुख वाडा तिथेच राहणार”, अशा शब्दांत अमित देशमुखांनी भाजपला ठणकावलं.

अमित देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून

दरम्यान, ज्या विलासरावांनी काँग्रेस खेड्यापाड्यात नेली. ज्या विलासरावांनी काँग्रेस वाढवली. त्यांचेच चिरंजीव भाजपच्या वाटेवर आहेत का? आमदार अमित देशमुख हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. पण या चर्चांमध्ये आता आणखी भर पडलीय ती भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकरांच्या एका वक्तव्यानं.

“राहुलजी लोणीकर सांगत होते की, अनेकजण भारतीय जनता पार्टीत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांच्यापैकी कदाचित लातूरच्या प्रिन्सची पण इच्छा झाली असेल. मग लातूरच्या प्रिन्सला भाजपमध्ये घ्यायचं का? लातूरच्या प्रिन्सला भाजपमध्ये घ्यायचं का? हे माझं मत नाही. हे लातूरकरांचं मत आहे”, असं संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले होते.

“लातूरच्या जनतेला ज्यावेळी ऑक्सिजन लागत होता. त्यावेळी लातूरचे प्रिन्स हे लातूरला नव्हते. आज भाजपमध्ये यायचं म्हणतात. कशासाठी? कुठंतरी आपल्याला सत्तेत राहायचं. चुकीचे कामं लपावयचे आहेत. यासाठी यायचं म्हणतात”, असं विधान संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं होतं.

संभाजी पाटील निलंगेकरांनी देशमुख बंधूंना भाजपमध्ये घेण्यास उघड विरोध केलाय. पण भाजप प्रदेशाध्यक्षांनी मात्र येत्या काळात पक्षात मोठे प्रवेश होणार असल्याचं सांगितलंय.

अमित देशमुख यांचा राजकीय प्रवास

अमित देशमुख हे 2009 पासून लातूर शहरातून निवडून येतात. 2014 साली काही महिन्यांसाठी त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. 2019 साली निर्माण झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्री होते. 2014 सालापासून ते काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत.

धीरज देशमुख यांचा राजकीय प्रवास

अमित देशमुखांचे भाऊ धीरज देशमुख हे लातूर ग्रामीणचे आमदार आहेत. 2019 साली ते पहिल्यांदा निवडून आले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते जनरल सेक्रेटरी आहेत.

अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

देशमुख बंधू जर भाजपमध्ये गेले तर भाजपच्या मराठवाड्यातल्या ताकदीत मोठी वाढ होणार आहे. आत्तापर्यंत काँग्रेसमधले अनेक मोठे नेते भाजपवासी झाले आहेत. नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, ज्योतिरादित्य शिंदे, हिमंता बिस्व सर्मा, रिटा बहुगुणा जोशी यांसारखे मोठे नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये जात मंत्री झाले आहेत.

अशोक चव्हाणही भाजपात जाण्याच्या चर्चा

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा आहेत. काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनीही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय.आणि आता संभाजी पाटलांच्या वक्तव्यामुळं विलासराव देशमुखांच्या दोन्ही मुलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झालीय.

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.