मंत्री तानाजी सावंत यांचा राजकीय दबदबा वाढणार? कोर्टाचा एक निर्णय… अमित देशमुख गटाला धक्का, पुढील 25 वर्षांसाठी तेरणा…

तेरणा कारखान्याचे जवळपास 120 खेडेगावात 32 हजारांच्यावर सभासद आहेत. उस्मानाबाद व शेजारील लातूर जिल्ह्यात संपर्क आहे.

मंत्री तानाजी सावंत यांचा राजकीय दबदबा वाढणार? कोर्टाचा एक निर्णय... अमित देशमुख गटाला धक्का, पुढील 25 वर्षांसाठी तेरणा...
तानाजी सावंतImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 1:14 PM

उस्मानाबादः तेरणा ज्याच्या ताब्यात राजकीय सत्ता त्याच्या खिशात असं उस्मानाबादेतलं समीकरणच आहे. त्यामुळे DRAT कोर्टाने दिलेला एक निर्णय मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यासाठी राजकीय गॅरेंटी देणाराच ठरू शकतो. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना (Terna Sugar Factory) मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे DRAT (कर्ज वसुली न्यायाधिकरण) कोर्टाने आदेश दिले आहेत.

उस्मानाबाद जिल्हा बँकेनी राबवलेली टेंडर प्रक्रिया योग्य असल्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली आहे. भैरवनाथ समूहाला आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग या आदेशामुळे मोकळा झाला आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची कारवाई झाली होती. मात्र माजी मंत्री अमित देशमुख यांच्या समूहाने याविरोधात DRAT कोर्टात याविरोधात याचिका दाखल केली होती. तब्बल एक वर्षाच्या न्यायलयीन लढाईनंतर तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाला मिळणार आहे त्यासाठी जिल्हा बँकेने पुढील प्रक्रिया तात्काळ राबविणे गरजेचे आहे.

तेरणा कारखान्याचा राजकारणात दबदबा

  • तेरणा कारखान्याचे जवळपास 120 खेडेगावात 32 हजारांच्यावर सभासद आहेत. उस्मानाबाद व शेजारील लातूर जिल्ह्यात संपर्क आहे. 1,500 कामगारांना रोजगार मिळणार असून यामुळे या भागातील आर्थिक गणित बदलणार आहे.
  • तेरणा ज्याच्या ताब्यात त्याकडे आमदारकी व इतर राजकीय सत्ता राहते हे आजवरचे गणित राहिले आहे. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघात तेरणा कारखाना केंद्रबिंदू असतो. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार आहेत,

जिल्हा बँकेला होणार फायदा –

  • तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याची 5,000 मेट्रीक टन इतकी गाळप क्षमता व देशी दारुचे उत्पादन तसेच वीज निर्मीतीचा 14 मेगावॅटचा प्रकल्पचा समावेश आहे. भाडेतत्वावर देताना हा कारखाना 25 वर्ष करारावर देण्यात येणार आहे, यामध्ये पहिल्या चार वर्षी दोन कोटी रुपये,तर पाच ते करारसंपेपर्यंत सहा कोटी रुपये वार्षिक भाडे स्विकारले जाणार आहे.
  • शिवाय भाड्यापोटी प्रतिमेट्रीक टन गाळपावर पहिले तीन वर्ष प्रति लिटर 73 रुपये, चौथ्या वर्षापासून करार संपेपर्यंत 81 रुपयाप्रमाणे दिले जाणार आहे.
  • डिस्टलरी पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये, दोन वर्ष दोन रुपये व पाचव्या वर्षीपासून चार रुपये करार संपेपर्यंत असणार आहे. देशी दारुवर पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये,दोन वर्ष दोन रुपये पाचव्या वर्षापासुन तीन रुपये आकारले जाणार आहे.
  • वीजनिर्मीती प्रकल्पाच्या उत्पादनावर पहिले चार वर्ष दोन टक्के तर पाचव्या वर्षापासून करार संपेपर्यंत तीन टक्के रक्कम आकारण्यात येणार आहेत. या भाडेकरारात कारखान्याची 105 हेक्टर 41 आर इतकी जमीन देखील मिळणार आहे.
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.