AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळातील ‘ती’ रिक्त जागा कोणासाठी; लक्ष्मण हाकेंनी थेट घेतलं ‘मविआ’तील या बड्या नेत्याचं नाव

आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीवर बोलताना लक्ष्मण हाके यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

मंत्रिमंडळातील 'ती' रिक्त जागा कोणासाठी; लक्ष्मण हाकेंनी थेट घेतलं 'मविआ'तील या बड्या नेत्याचं नाव
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2025 | 6:41 PM
Share

आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळातून समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  या बैठकीवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.   ‘शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी कुठे आहे?  मी ती राष्ट्रवादी वेगळी मनातच नाही. ते एकच आहेत. पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचे काम आजपर्यंत केलं आहे,’ असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके?

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी कुठे आहे? मी राष्ट्रवादी वेगळी मनात नाही. पवार कुटुंबीय कधीच वेगळे नव्हते. अजितदादांचा पहाटेचा शपथविधी असो की आता जाऊन भाजपला मिळणं असो. पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचे काम आजपर्यंत केलं आहे. पवार कुटुंबीयांनी आजपर्यंत एकही चळवळ लढवली नाही. पवार कुटुंब नेहमी सत्तेत राहाणारं आहे, त्यामुळे मला नाही वाटत ते फार काळ सत्तेच्या बाहेर राहू शकतील असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलाताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष विशेषत: राष्ट्रवादी पक्ष शरद पवार हे सत्तेच्या बाहेर कधीच राहू शकत नाहीत,  भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आले, कारण ती जागा एकतर रोहित पवार किंवा जयंत पाटील यांना ठेवली होती, असं हाके यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांनी विरोधी पक्षात काम केलं पाहिजे. लोकनेता व्हायचं असेल तर जनसामान्य लोकांची कामं केली पाहिजेत, असा सल्लाही यावेळी हाके यांनी दिला आहे.

दरम्यान सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर देखील हाके यांनी प्रक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि राज्यातील विरोधी पक्षाची जी पोकळी आहे ती त्यांनी भरून काढावी, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...
CJI Surya Kant : निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर प्रश्नचिन्ह नव्हे; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं महत्त्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले? 
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?