AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Narvekar : ‘लवकरात लवकर मराठी भाषा शिका, अन्यथा त्यांच्या चेहऱ्यावर..’ मनसेचा राहुल नार्वेकरांना इशारा

Rahul Narvekar : महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मराठी वाचताना काही चूका झाल्या. त्यावरुन त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर राहुल नार्वेकरांना मराठीची पुस्तके पाठवून इशारा दिला आहे.

Rahul Narvekar : 'लवकरात लवकर मराठी भाषा शिका, अन्यथा त्यांच्या चेहऱ्यावर..' मनसेचा राहुल नार्वेकरांना इशारा
Raj Thackeray-Rahul Narvekar
| Updated on: Jun 24, 2026 | 12:46 PM
Share

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या मराठी वाचनामुळे वादात सापडले आहेत. नार्वेकरांना त्यांच्या मराठी उच्चारणावरुन ट्रोल करण्यात येत आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल दुसरा दिवस होता. यावेळी सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर बोलताना राहुल नार्वेकर यांच्याकडून वाचनात चुका झाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मराठी वाचनाची लगेच दखल घेत त्यांच्यावर बोचरी टीका केली. “महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध” अशा शब्दात राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला.

आज सोलापूर मनसेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. राहुल नार्वेकर यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठी शुद्धलेखनाची पुस्तके पोस्टामार्फत पाठवली. “विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आज आम्ही मराठी पुस्तके पाठवत आहोत. त्यांनी लवकरात लवकर मराठी भाषा शिकावी अन्यथा त्यांच्या चेहऱ्यावर बाराखडी काढल्याशिवाय राहणार नाही. राहुल नार्वेकर यांनी मराठी शिकावी, अन्यथा आमच्या शिक्षक सेनेचे पदाधिकारी त्यांना घरी जाऊन मराठी शिकवतील” असा मनसेने इशारा दिला आहे.

ती केवळ पुस्तके नसून मराठीचा स्वाभिमान,अभिमान आहे

“विधानसभा अध्यक्षांना जी पुस्तके पाठवतोय ती केवळ पुस्तके नसून मराठीचा स्वाभिमान,अभिमान आहे. कोणत्याही प्रकारे आम्ही आमचा मराठीचा स्वाभिमान गहाण टाकणार नाही” असं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राहुल नार्वेकर यांनी सुद्धा मराठी वाचताना ज्या चूका झाल्या त्या बद्दल दिलगिरी व्यक्त केली व आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिलं. “सर्वांसारखा मलाही मराठीचा अभिमान आहे. वाचन करताना माझ्याकडून चूक घडली” हे त्यांनी मान्य केलं. घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं राहुल नार्वेकर म्हणाले. ‘प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होता’ असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!