साहित्य संमेलनात झणझणीत बेत; चक्क खान्देशी भरीत अन् कळण्याची भाकरी, सोबतीला अजून बरंच काही…!

साहित्य संमेलनात थेट खान्देशापासून विदर्भ, मराठवाडा ते नाशिकमधील खाद्य पदार्थांच्या सुग्रास भोजनाचा बेत आखण्यात आला आहे.

साहित्य संमेलनात झणझणीत बेत; चक्क खान्देशी भरीत अन् कळण्याची भाकरी, सोबतीला अजून बरंच काही...!
नाशिकच्या साहित्य संमेलनात खान्देशी भरीत आणि भाकरीवर रसिकांना ताव मारता येणार आहे.
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 8:05 AM

नाशिकः नाशिकच्या साहित्य संमेलनात साहित्यिकांचा यथासांग पाहुणचार केला जाणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीमध्ये उभारण्यात आलेले मोठ मोठे व्यासपीठ, राहण्याची केलेली चोख व्यवस्था आणि सोबतच जेवण म्हणून थेट खान्देशापासून विदर्भ, मराठवाडा ते नाशिकमधील खाद्य पदार्थांच्या सुग्रास भोजनाचा बेत आखण्यात आला आहे. त्यामुळे येथे येणारा रसिक आणि साहित्यिक बरोबर काय घेऊन जातो माहिती नाही. मात्र, तो तृप्त होऊन नक्की जाईल.

असा असेल मेन्यू

साहित्य संमेलनात येणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन येथे घडणार आहे. तुमच्या ताटातील मेन्यूच तसा ठेवण्यात आला आहे. कळण्याची भाकरी आणि खान्देशी भरीत, काळ्या मसाल्याची शेवभाजी आणि खोन्देशी फौजदारी डाळ, धपाटे आणि मराठवाडी वडा-भात, कोकणातील अळूची भाजी, बटाटा भाजी, विदर्भातील वडा-भात, मसूर खिचडी आणि शाकाहरी सावजी रस्सा. सुटले की नाही वाचूनच तोंडा पाणी. अहो, खरी गंमत पुढे आहे. विशेष म्हणजे संमेलनात कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा तो ही शुद्ध शाकाहारी आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी खायला मिळणार आहे. समारोपादिवशी नाश्त्यात नाशिकची मिसळ, जेवणात पुरणपोळी आणि काळी कटाची आमटी असा जोरदार बेत आखण्यात आला आहे.

100 ते 150 रुपये शुल्क

संमेलनात सदस्य शुल्क भरून उपस्थित राहणाऱ्यांना जेवण, चहा, नाश्त्यासाठी कूपन देण्यात येणार आहेत. मात्र, नोंदणी न करता आलेल्यांसाठी प्रत्येकी 100 ते 150 रुपये आकारण्यात येणार आहेत. अन्नाची नासाडी होऊ नये यावर भर देण्यात येणार आहे. जी व्यक्ती ताटात उष्टे टाकेल, त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे या अन्नाची अन्न आणि औषध विभाग दररोज तपासणी करणार आहे. त्यानंतरच ते अन्न काऊंटरवर जाणार आहे.

3 हजार क्षमतेचे भोजनगृह

साहित्य संमेलनाच्या आवारात तब्बल 3 हजार क्षमतेचे भोजनगृह उभारण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे एकावेळी 1 हजार जणांना भोजनगृहात सोडण्यात येणार आहे. त्यात सकाळी चहा, नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा आणि रात्री जेवण मिळणार आहे. रसिक आणि साहित्यिकांची चोख क्षुधाशांती करण्यासाठी नाशिककरांचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

इतर बातम्याः

Omicronचे भयः नाशिकमध्ये पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे

ओमिक्रॉनमुळे साहित्य संमेलनाचे होणार काय, मुख्य मंडपाची आसनक्षमता 14 हजार, बाका प्रसंग उद्भवला…!

संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय…?

Non Stop LIVE Update
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.