AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय…?

नकटीच्या लग्नाला सतरा विघ्नं, अगदी या म्हणीसारखे नाशिकच्या साहित्य संमेलनाचे होताना दिसत आहे. संमेलनाच्या वाट्याला आलेली सतराशे साठ विघ्ने सरता सरत नसताना, त्यात एकेक नवे लचांड रोज समोर येत आहे.

संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय...?
नाशिकच्या साहित्य संमेलनात संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 10:28 AM

नाशिकः नकटीच्या लग्नाला सतरा विघ्नं, अगदी या म्हणीसारखे नाशिकच्या साहित्य संमेलनाचे (Sahitya Sammelan) होताना दिसत आहे. संमेलनाच्या वाट्याला आलेली सतराशे साठ विघ्ने सरता सरत नसताना, त्यात एकेक नवे लचांड रोज समोर येत आहे. त्यामुळे स्पष्टीकरण देताना निमंत्रकांच्या नाकी नऊ येत आहेत. यात सोशल मीडियावरही साहित्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल झोडपणे सुरूच आहे. प्रसिद्ध कवी संदीप खरे (Sandeep Khare) आणि संगीतकार सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांची मैफल माझे जीवीची आवडी साहित्य संमेलनात होणार आहे. यावर सध्या सोशल मीडियावर, त्यातही फेसबुकवर ही कंपूगिरी आहे. एकाच गल्लीतील कार्यक्रम आहे, अशी टीका होताना दिसत आहे.

काय आहे मैफल?

नाशिकचे साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर दरम्यान आहे. मात्र, ग्रंथदिंडीच्या पूर्वसंध्येला 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘माझे जीवीची आवडी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. विनोद राठोड हे कार्यक्रम समन्वयक आहेत. या कार्यक्रमात संत रचनांपासून ते स्वातंत्र्यवीर सावकरकर, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बोरकर, आरती प्रभू, ग्रेस, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके, वसंत बापट या मान्यवरांचा काव्य आणि गीतातून संगीतमय देखणा प्रवास उलगडला जाणार आहे.

टीका का होतेय?

गीत-संगीतमय असलेल्या या मैफलीचे कवी संदीप खरे आणि सगींतकार सलील कुलकर्णी हे सादरकर्ते आहेत. सोबतच ह्रषिकेश रानडे, विभावरी आपटे-जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी हे गायक आहेत. तर चिन्मयी सुमित आण विभावरी देशपांडे या काव्यवाचन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांचे आहे. या कार्यक्रमाला वादक म्हणून आदित्य आठल्ये, रितेश ओहोळ, सत्यजित प्रभू, राजेंद्र दूरकर आणि अमर ओक यांची साथसंगत राहणार आहे. या मैफलीतील बहुतांश कलाकार नावावरून तरी एकाच जातीचे वाटत आहेत. त्यामुळे ही मैफल होण्यापूर्वीच प्रचंड ट्रोल होताना दिसते आहे.

काय होतेय टीका?

फेसबुकवर प्रचंड प्रमाणात शेलक्या शब्दांतून या होणाऱ्या मैफलीवर टीका होतेय. केतनकुमार पाटील यांनी फक्त एका ओळीत कार्यक्रम पत्रिका पोस्ट करून टीका केलीय. ते म्हणतात, आणि असे असते ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. एकाच गल्लीतील कार्यक्रम. प्रज्ञा ब्रह्मांडे यांनी ही एका विशिष्ट जातीची कंपूगिरी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. प्रथमेश पाटील यांनी हे जातवार संमेलन असल्याचे म्हटले आहे, तर राजा गोंदकर यांनी गल्ली बाहेर कला-साहित्य वगैरे असे काही असते तरी का? उगाच आपलं काहीतरी? अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सोबतच जगणं हाच एक लढा दररोज असतो. त्यांना कला-साहित्य कसं सुचेल. त्यांच्या जगण्यावर पोट भरलेले मध्यमवर्गीय लोक कविता करतात. मग उच्च मध्यमवर्गीय तिकीट काढून दमलेला बाबा ऐकतात, असा टोलाही हाणला आहे. अशा असंख्य टीका टिप्पणीचा रतीब आपल्याला झालेला दिसतो आहे.

इतर बातम्याः

Nashik | साहित्य संमेलनाची डिजीटल कात; चक्क घरात बसून पाहता येणार, कसे घ्या जाणून…!

नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, पठारे यांचे खडेबोल

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.