लोकसभा निवडणूक 2024: चार मृत कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम, दुसरीकडे ड्यूटी रद्द करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भन्नाट कारणे

election duty Lok Sabha Election 2024 News in Marathi: वैद्यकीय प्रकरणांशी निवडीत कारणांची प्रशासनाकडून बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. बोगस मेडिकल प्रमाणपत्र देऊन जर कोणी ड्युटी रद्द करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा प्रकरणात प्रशासनाने कडक कारवाई करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूक 2024: चार मृत कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम, दुसरीकडे ड्यूटी रद्द करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भन्नाट कारणे
election 2024
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 8:37 AM

लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्षाकडून सुरु आहे. प्रचाराला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या १९ एप्रिल रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांचा जोरात प्रचार सुरु झाला आहे. मतदानासाठी प्रशासनाची तयारी सुरु आहे. कर्मचाऱ्यांना ड्यूट्या लावल्या जात आहेत. परंतु प्रशासकीय कारभाराचा अजब नमूना समोर आला आहे. चार मृत कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्यूटी लावली आहे. आता या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काही कर्मचाऱ्यांनी ड्यूटी लागू नये म्हणून अजबगजब कारणे देऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय होते प्रकरण

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पाठविलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या यादीनुसार ड्युटीचे आदेश काढले होते. त्यामध्ये चार मृत कर्मचारी आणि धाराशिव येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रातील ११ जणांचा समावेश होता. या प्रकरणाची गंभीर दाखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडे कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविला आहे. त्यानुसार तत्कालीन प्रभारी कुलसचिव तथा आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड यांना ही नोटीस पाठवली आहे.

कर्मचाऱ्यांनी अशी शोधली कारणे

निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी सरकारी कर्मचारी विविध कारणे शोधत असतात. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आजवर 400 हून अधिक कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम रद्द करण्यासाठी अर्ज दिले आहे. त्या अर्जात “एक से बढकर एक” अशी भन्नाट कारणे देखील दिल्याची माहिती समोर आली. कुणाची बायको, आई आणि मुले आजारी असल्याचे कारणांसह अर्ज दिलेले आहे. काही स्वत: आजारी असल्याची कारणे दिली आहे. त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडले आहे.

हे सुद्धा वाचा

बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई

वैद्यकीय प्रकरणांशी निवडीत कारणांची प्रशासनाकडून बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. बोगस मेडिकल प्रमाणपत्र देऊन जर कोणी ड्युटी रद्द करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा प्रकरणात प्रशासनाने कडक कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी बोगस मेडिकल प्रमाणपत्राचाही आधार घेतल्याची माहिती समोर आली होती.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.