AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतचोरी विरोधात मविआचा भव्य मोर्चा 1 नोव्हेंबरला, किती वाजता निघणार? मार्ग काय असणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

"काँग्रेस पक्षाचा मोर्चाला पाठिंबा आहे. काँग्रेसमुळेच मतचोरीला वाचा फुटली आहे. काँग्रेसचं नेतृत्व व्यस्त आहे. त्यामुळे आज आले नाही. मोर्चात सर्व येतील. सर्व वरिष्ठ नेते येतील" अशी माहिती काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली.

मतचोरी विरोधात मविआचा भव्य मोर्चा 1 नोव्हेंबरला, किती वाजता निघणार? मार्ग काय असणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Anil Parab
| Updated on: Oct 30, 2025 | 2:19 PM
Share

“दिनांक 1 नोव्हेंबर शनिवारी निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार देखील मोर्चात सामील होतील. मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबले” अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली. मतदार यादीतील घोळासंदर्भात येत्या 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा निघणार आहे.

“आघाडीचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील आणि मोर्चाला मार्गदर्शन करतील. केवळ राजकीय पक्ष नाही तर ज्यांना आपलं मत चोरीला गेलंय असं वाटतंय, आणि ज्या चुकींच्या मतावर सरकारमध्ये बसलंय असं वाटतं ते लोकही मोर्चात सहभागी होतील” असं अनिल परब म्हणाले. “पोलिसांना भेटलो. सूचना घेतल्या. मोर्चाचे रुट प्रसिद्ध केले आहेत. उद्या क्यूआर कोड पाठवू. म्हणजे लोकांची व्यवस्था होईल. मुंबईवरून येणाऱ्या दोन लोकांची वाहन व्यवस्था राहील. मतचोरीबाबत प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील” असं अनिल परब म्हणाले.

‘आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळावा’

‘शरद पवार मोर्चाला उपस्थित राहणार’ असं अनिल परब यांनी सांगितलं. “मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा निघणार आहे. आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळावा” असं अनिल परब यांनी सांगितलं. “आम्ही मतचोरीचा बारकाईने अभ्यास करतो. मतदार यादीतील घोळ दूर करा. आम्ही घेतलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. चोक्कलिंगम यांनी जे सांगितलं त्यावरही अभ्यास करत आहोत. आमचा मोर्चा आमच्या आणि मतदारांच्या मागणीसाठी आहे” असं अनिल परब म्हणाले. “चोर चोऱ्या करणार. आमच्यावर गुन्हे दाखल करणार. रोहित पवार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल केला.रोहित पवार वगैरे घाबरणारे नाहीत.बिनधास्त नडत आहेत.हा गांधी नेहरूंचा देश आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.