AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता जिल्हा बँकेमध्येही महाविकास आघाडी पॅटर्न, मात्र, ‘या’ जिल्ह्यात काँग्रेस मोठा भाऊ

यवतमाळ जिल्हा बँकेमध्ये महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्यात येणार आहे. इथं काँग्रेस मोठा भाऊ असेल. Maha Vikas Aghadi Pattern

आता जिल्हा बँकेमध्येही महाविकास आघाडी पॅटर्न, मात्र, 'या' जिल्ह्यात काँग्रेस मोठा भाऊ
यवतमाळ जिल्हा बँकेत महाविकासआघाडी पॅटर्न
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 03, 2021 | 5:14 PM
Share

यवतमाळ: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. हाच महाविकास आघाडीचा पॅटर्न यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून येत आह. यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीची बैठक रेमंड रेस्ट हाऊस येथ ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवनिर्वाचित संचालकांची मते जाणून घेण्यात आली. ( Maha Vikas Aghadi Pattern implemented in Yavatmal DCC Bank  Congress Get Chairman Post)

काँग्रेस मोठा भाऊ

यवतमाळचे पालकंमत्री आणि वनमंत्री संजय राठोड, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या उपस्थित बैठक झाली. यामध्ये सर्व नवनिर्वाचित संचालकांची मतं जाणून घेण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष व दोन उपाध्यक्ष बनविण्याबाबत एकमत झाले. प्रत्येक पक्षाने एक पद घेण्याबाबत चर्चा झाली असून यवतमाळमध्ये काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका बजावणार आहे. काँग्रेसकडे अध्यक्षपद दिले जाणार असून एक उपाध्यक्षपद शिवसेनेला आणि एक राष्ट्रवादी कॉग्रेसला दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोमवारी ( 4 जानेवारी) अंतिम निर्णय

यवतमाळ जिल्हा बँकेंच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांची सोमवारी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. महाविकास आघाडी समोर भाजप प्रणित शेतकरी आघाडीचं आव्हान आहे.

यवतमाळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल 22 डिसेंबर रोजी लागला. यामध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. महाविकास आघाडीनं 21 पैकी 15 जागांवर विजय मिळवला तर भाजपनं 3 जागा तर अपक्षांनी 3 जागांवर विजय मिळवला. यामुळे महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ जिल्हा बँक निवडणुकीतही मतदारांनी कौल दिल्याचे दिसून आले. काँग्रेसनं सर्वाधिक 11 जागांवर विजय मिळवला आहे.

सात जिल्हा बँकांच्या निवडणूका लवकरच

राज्यातील सात जिल्हा बँकासह काही सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अहमदनगर, बीड , नांदेड, गडचिरोली, अकोला, औरंगाबाद आणि परभणी जिल्हा बँकाची निवडणूक लागणार आहे. सोमवार 4जानेवारी 202 पासून या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी याबाबत माहिती दिली होती.

संबंधित बातम्या:

साताऱ्यातील अंगापूर तर्फ तारगावमध्ये महिलाराज, ज्येष्ठ नागरीक आणि तरुणाईचा निर्धार

आधी बिनविरोध निवडीचे फ्लेक्स, नंतर निवडणुकीची तयारी; ‘या’ ग्रामपंचायतीचा गोंधळात गोंधळ

( Maha Vikas Aghadi Pattern implemented in Yavatmal DCC Bank  Congress Get Chairman Post)

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...