महाडमधील पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात, घनकरचा व्यवस्थापनासह ‘या’ विभागांकडून तातडीची मदत

घनकचरा व आरोग्य विभागातर्फे चालकासहित 2 जेसीबी, 2 पाण्याचे टँकर, 3 टन कचरा उचलू शकणारे 4 टिपर, दोन फॉगींग मशिन्स, फवारणीसाठी 500 किलो जंतूनाशक केमिकल्स, याचबरोबर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 50 स्वच्छता कर्मचारी व 5 पर्यवेक्षक यांचे विशेष पथक पाठविण्यात आले आहेत.

महाडमधील पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात, घनकरचा व्यवस्थापनासह 'या' विभागांकडून तातडीची मदत
महाडमधील पूरग्रस्तांसाठी पनवेल महापालिका मदतीचा हात
हर्षल भदाणे पाटील

| Edited By: सागर जोशी

Jul 27, 2021 | 7:38 AM

पनवेल : महाड शहर परिसरामध्ये 22 जुलैला जोरदार अतिवृष्टी होऊन महापुराची स्थिती निर्माण झाली. अनेकांचे संसार वाहून गेले, अनेकांची दुकाने उध्वस्त झाली, पूरग्रस्तांना जीवनाश्यक मदतीसाठी सर्वत्र आवाहन होत आहे. या संकटकाळत महाडमधील पूरग्रस्तांना पनवेल महानगरपालिकेने मदतीचा हात देऊ केला आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानूसार घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, वाहन विभाग यांच्यावतीने तातडीने मदत पोहचविण्यात आली आहे. (Panvel Municipal Corporation helps flood victims in Mahad)

घनकचरा आणि आरोग्य विभागातर्फे चालकासहित 2 जेसीबी, 2 पाण्याचे टँकर, 3 टन कचरा उचलू शकणारे 4 टिपर, दोन फॉगींग मशिन्स, फवारणीसाठी 500 किलो जंतूनाशक केमिकल्स, याचबरोबर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 50 स्वच्छता कर्मचारी व 5 पर्यवेक्षक यांचे विशेष पथक पाठविण्यात आले आहेत. तसेच 10 हजार पाण्याच्या बाटल्या, 6 हजार बिस्कीट पुडे पाठविण्यात आले आहे आहेत. अग्निशमन विभागातर्फे एक फायर फायटर गाडीही 4 कर्मचाऱ्यांसहित तातडीने महाडला पाठविण्यात आली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकाही धावली

रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाच्या पथकांचे प्रत्यक्ष कार्य सुरु झाले आहे. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज पहिल्याच दिवशी साफसफाई, आरोग्य तपासण्यांच्या कामाने वेग घेतला आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी 250 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने काम सुरु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेची विविध पथके महाड आणि पोलादपूरसाठी रवाना करण्यात आली आहेत. या विविध पथकातंर्गत आजपासून प्रत्यक्ष कामाला जोरदार सुरुवात झाली आहे.

महापालिकेची ही पथके महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या समन्वयाने उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्त्याखाली काम करत आहेत.

संबंधित बातम्या :

Chiplun Flood : चिपळूणच्या तिवरे गावाला मुसळधार पावसाचा तडाखा, 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावले!

भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच जागा निवडा: अजित पवार

Panvel Municipal Corporation helps flood victims in Mahad

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें