AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे – सुप्रिया सुळेंचा इशारा

माझ्या मतदारसंघात कुणीही दमदाटी करायची नाही, धमकी द्यायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला. हर्षवर्धन पाटलांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे..असे सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला सुनावले.

माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे - सुप्रिया सुळेंचा इशारा
| Updated on: Mar 15, 2024 | 11:19 AM
Share

पुणे | 15 मार्च 2024 : माझ्या मतदारसंघात कुणीही दमदाटी करायची नाही, धमकी द्यायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला. हर्षवर्धन पाटलांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे..असे सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला सुनावले. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटावर हल्ला चढवला.

पैशांची मस्ती आली आहे, सुप्रिया सुळेंचा घणाघात

माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे. माझा नंबर लिहू घ्या. तुम्हाला कोणाचाही फोन आला तर माझा नंबर द्या आणि सांगा की आधी सुप्रिया ताईशी बोला. मी बोलते मग, बघून घेईन, असं सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं. बारामती मतदारसंघात किंवा राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेते एकमेकांना धमकी देत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? असा खडा सवाल विचारत त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.

सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे, जसा चढता काळ येतो, तसा उतारही येतो. मला काहीच करायची गरज नाही, त्यांची सगळी मस्ती जनता लवकरच उतरवेल, असा इशाराचा त्यांनी दिला. आम्ही लोकशाहीने निवडणूक लढवत आहोत त्यामुळे आम्ही दडपशाहीला घाबरणार नाही,असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं होतं ?

भाजपात गेल्याने आपल्याला शांत झोप लागते असे विधान करुन चर्चेत आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या इंदापूरात फिरु नको म्हणून धमकी मिळाली असल्याची तक्रार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. भाजपाचे मित्रपक्षच आपल्या शिवीगाळ करीत असल्याचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते. हे अत्यंत धक्कादायक असून यात तात्काळ लक्ष घालावे असे पत्रच हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले होते. त्याच मुद्यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला तसेच अजित पवार गटालाही लक्ष्य केलं.

Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार