AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly election: विधानसभेत किती पाडणार? 20 तारखेला ठरणार

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत असली. तरी वंचित आणि परिवर्तन महाशक्ती अशा 2 आघाड्या आहेत. तर जरांगे पाटील 20 तारखेला ठरवणार आहेत की, पाडापाडी करायची की निवडणूक लढवायची. जरांगेंनी तर निवडणूक लढवली तर काय होऊ शकतं, तेही पाहुयात

Maharashtra Assembly election: विधानसभेत किती पाडणार? 20 तारखेला ठरणार
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 16, 2024 | 10:26 PM
Share

पाडापाडी करणार की विधानसभा निवडणुकीत उमेदवार देवून निवडणूक लढणार याचा फैसला, जरांगे पाटील 20 तारखेला घेणार आहेत. त्यासाठी मराठा बांधवांना त्यांनी 20 तारखेला अंतरवाली सराटीला बोलावलं आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर शिंदेंना आरक्षण देण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. मराठ्यांना मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण द्यायचंच आहे, मात्र फडणवीसांनी रोखल्याचं जरांगे म्हणाले आहेत. तर, अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असताना फडणवीसच टार्गेट का ?, शिंदेंवर का बोलत नाही असा सवाल मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे.

इकडे मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारनं मराठा समाजासाठी काय काय केलं, हे पाहावं. ज्यांनी काहीच दिलं नाही त्यांचा जरांगेंनी निवडणुकीत विचार केला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या संभाजी राजेंनी जरांगेंना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. मनोज जरांगे यांनी एक तर सोबत यावं किंवा उमेदवार तरी द्यावेत असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर, मराठवाड्यात 8 पैकी 7 लोकसभा मतदारसंघात जरांगेंना फॅक्टर दिसला. जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झालेत. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पराभूत झाले. बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे विजयी झाले. पंकजा मुंडे पराभूत झाल्या, लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी झाले, भाजपच्या सुधाकर श्रृंगारेंचा पराभव झाला. नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत राव चव्हाण विजयी झाले तर भाजपचे प्रतापराव चिखलीकरांचा पराभव झाला.

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव विजयी झालेत…महायुतीचे महादेव जानकर पराभूत झाले. हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे बाबूराव कोहळीकर पराभूत झाले. धाराशीवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजय झाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांचा पराभव झाला.

फक्त छत्रपती संभाजीनगर ही एकमेव मराठवाड्यातली जागा आहे जिथं शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले आणि MIMचे खासदार इम्तियाज जलील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे. पण सरसकट मराठा समाजाला ओबीसी करणं शक्य नसल्याचं सरकारनं म्हटलं. त्यामुळं आता लोकसभेप्रमाणं पाडापाडी होणार की स्वत: जरांगे आमदार निवडून आणण्यासाठी उमेदवार देणार हे 20 तारखेला ठरेल.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...