AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वीज बिलात…”, एकनाथ शिंदेंच्या 10 महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, रोजगार निर्मिती आणि वृद्धांना पेन्शन वाढ यासारख्या प्रमुख घोषणा करण्यात आल्या.

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वीज बिलात..., एकनाथ शिंदेंच्या 10 महत्त्वाच्या घोषणा
| Updated on: Nov 06, 2024 | 10:48 AM
Share

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या दोन आठवड्यांनी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह रोजगाराबद्दलही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यापूर्वी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांसह महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 कलमी कार्यक्रम सादर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.

एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

१) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती. २) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये. ३) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी. ४) वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत. ५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार. ६) राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार. ७) ४५ हजार पांदण रस्ते बांधणार. ८) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन. ९) वीज बिलात ३० टक्के कपात. १०) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार.

पंचगंगेच्या महापुरावर तोडगा काढण्यासाठी योजना

या १० कलमी कार्यक्रमासह एकनाथ शिंदेंनी पंचगंगेच्या महापुरावर तोडगा काढण्यासाठीची नवीन योजनाही जाहीर केली. “कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या पंचगंगेच्या महापूरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ३२०० कोटींची योजना सरकारने आणली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्यांऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे”, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

यावेळी एकनाथ शिंदेंनी आमचे सरकार विकास करणारे सरकार आहे, असेही सांगितले. “डबल इंजिनचे सरकार हे विकास करणारे सरकार असून राज्याचा विकास करायचा असेल तर राज्यात समविचारी सरकार असायला हवे”, असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले. “आमच्यावर दिल्लीत जातो म्हणून टीका होते, मात्र राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.