AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 25 जागांवर राज ठाकरेंचे उमेदवार, कुठे-कुठे होणार शिंदे विरुद्ध मनसे लढत?

मुंबईतील ३६ मतदारसंघात जोरदार लढत रंगणार आहे. महाविकासआघाडी आणि भाजप-शिंदे गटातील आधीच तीव्र लढत होणार असून मनसेनेही मुंबईत उमेदवार दिले आहेत. यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुंबईत 25 जागांवर राज ठाकरेंचे उमेदवार, कुठे-कुठे होणार शिंदे विरुद्ध मनसे लढत?
Updated on: Nov 04, 2024 | 4:27 PM
Share

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील काही जागांवर महायुती विरुद्ध महाविकासाआघाडी, तर काही महायुती विरुद्ध महाविकासआघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

36 पैकी 25 जागांवर मनसेचे उमेदवार

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 25 जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार घोषित केले आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक उमेदवार लढवणार असल्याचे सांगितले होते. मनसेने मुंबईतील 25 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे महायुतीत अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मनसेने मुंबईतील विधानसभेच्या 36 पैकी 25 जागांवर निवडणूक लढवत असल्याने या सर्व जागांवर मनसे विरुद्ध महायुती सा सामना रंगणार आहे. या २५ जागांपैकी भाजप 17 जागांवर तर शिवसेना शिंदे गट 16 जागांवर निवडणूक लढवत आहे.

यंदा माहीम आणि वरळी विधानसभा मतदारसंघ हे मुंबई विधानसभा निवडणुकीत हायव्होलेटेज मतदारसंघांपैकी एक असणार आहेत. कारण माहीम आणि वरळी विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात मनसे, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. मनसेने माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. त्याविरुद्ध ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिंदे गटाकडून सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

मुंबईतील कोणत्या जागांवर शिंदे गट विरुद्ध मनसे लढत? 

मतदारसंघ शिंदे गट महाविकासआघाडी मनसे
अणुशक्तीनगर अविनाश राणे सना मलिक शेख नवीन आचार्य
कुर्ला मंगेश कुडाळकर मिलिंद कांबळे प्रदीप वाघमारे
वरळी मिलिंद देवरा आदित्य ठाकरे संदीप देशपांडे
विक्रोळी सुवर्णा कारंजे सुनील राऊत विश्वजित ढोलम
माहीम सदा सरवणकर महेश सावंत अमित ठाकरे
चेंबूर तुकाराम काते प्रकाश फातर्पेकर माऊली थोरवे
मानखुर्द शिवाजीनगर सुरेश पाटील अबु आझमी जगदीश खांडेकर
भांडुप पश्चिम अशोक पाटील रमेश कोरगावकर शिरीष सावंत
चांदिवली दिलीप लांडे आरिफ खान महेंद्र भानुशाली
जोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर अनंत बाळा नर भालचंद्र अंबुरे
दिंडोशी संजय निरुपम सुनील प्रभू भास्कर परब
मागाठाणे प्रकाश सुर्वे उदेश पाटेकर नयन कदम
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका.