AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजय चौधरी की सुधीर साळवी? उद्धव ठाकरेंसमोर धर्मसंकट, शिवडी विधानसभेतून कोणाला मिळणार उमेदवारी?

शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

अजय चौधरी की सुधीर साळवी? उद्धव ठाकरेंसमोर धर्मसंकट, शिवडी विधानसभेतून कोणाला मिळणार उमेदवारी?
सुधीर साळवी अजय चौधरी
| Updated on: Oct 24, 2024 | 8:22 AM
Share

Maharashtra Assembly Elections 2024 : सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी फार वेगाने घडत आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे, कोपरी – पाचपाखडी मतदारसंघातून केदार दिघे, ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांसह अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. पण शिवडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवडी विधानसभेतून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोन शिवसैनिक इच्छुक आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, याचा तिढा सोडवला जाणार आहे. आज दुपारी साधारण 3 च्या दरम्यान एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पाच शाखाप्रमुखांचा सुधीर साळवींच्या बाजूने कौल

शिवडी विधानसभेतील ५ पैकी ५ शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजूने भूमिका घेतली आहे. तसेच युवा सेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनीही सुधीर साळवींच्या बाजूने कौल दिला आहे. पण अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आणि जुने नेते आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत ते उद्धव ठाकरेंसोबत थांबले. त्यामुळे त्यांचेही मातोश्रीवर महत्त्वाचं स्थान आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघाबद्दल एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकील शिवडीतील सर्व महत्त्वाचे पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवडीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

सुधीर साळवी की अजय चौधरी? उमेदवारी कोणाला?

शिवडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अजय चौधरी हे ठाकरे गटाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. तर लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून लोकसभा समन्वयक म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2009 ची निवडणूक वगळता शिवडीतून शिवसेनेचे उमेदवार विधानसभेवर निवडून गेले आहेत. 2009 मध्ये मनसेकडून बाळा नादंगावकर यांनी येथे विजय मिळवला होता.

त्यामुळे आता या मतदारसंघातून अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यातील कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या या मतदारसंघातून मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.