Maratha Reservation | “अशोक चव्हाणांना कायदा कळत नाही, वेड पांघरून पेडगावला जात आहेत”, चंद्रकांत पाटालांची घणाघाती टीका

इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का नाही दिलं नाही ?," असा खोचक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (chandrakant patil ashok chavan maratha reservation)

Maratha Reservation | अशोक चव्हाणांना कायदा कळत नाही, वेड पांघरून पेडगावला जात आहेत, चंद्रकांत पाटालांची घणाघाती टीका
chandrakant patil
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 11:51 PM

कोल्हापूर : “अशोक चव्हाण यांना इतर कायदा कळत नाही. किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. ते आता केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) का दिलं नाही ?,” असा खोचक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना केलाय. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. त्यानंतर राज्य सरकारने आता केंद्र सरकारनेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी भूमिका घेतली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी मदत करावी, असे आवाहनसुद्धा मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी केले आहे. अशोक चव्हाण यांच्या याच भूमिकेनंतर चंद्रकांत पाटील यांनी वरील कक्तव्य केले. (Maharashtra BJP chief Chandrakant Patil criticizes mahavikas aghadi congress and Ashok Chavan on Maratha reservation)

महाविकास आघाडी सरकारने जबाबदारी पार पाडावी

यावेळी बोलताना त्यांनी “राज्याच्या महत्त्वाच्या विषयात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार वारंवार आपली जबाबदारी झटकत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही तोच प्रकार घडत आहे. परंतु, मराठा समाज हे सहन करणार नाही. घटनेच्या 102 व्या दुरुस्तीनंतरही राज्यात एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचा राज्य सरकारचा अधिकार आणि जबाबदारी कायमच आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने जबाबदारी पार पाडावी,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्य सरकार जबाबदारी झटकू शकत नाही

तसेच पुढे बोलताना “घटनेच्या 102 व्या दुरुस्तीनंतर राज्याला मराठा आरक्षणाबाबत अधिकार उरला नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारकडे जाणार असे अशोक चव्हाण वारंवार म्हणत आहेत. समाजाची दिशाभूल कऱण्यासाठी वेड पांघरून पेडगावला जाण्याचा हा प्रकार आहे. या घटनादुरुस्तीनंतरही राज्याचा आपल्या राज्यासाठी एखादी जात मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास ठरविण्याचा तसेच त्याला आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित आहे. या घटनादुरुस्तीनुसार राज्याच्या मागासवर्ग आयोगाने एखाद्या जातीला मागास ठरविले की त्याचा अहवाल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवायचा, त्यांनी तो राष्ट्रपतींकडे पाठवायचा आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर कायदा संबंधित राज्यानेच करायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार याबाबतीत जबाबदारी झटकू शकत नाही. आताही चेंडू तुमच्याच अंगणात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडून किंवा केंद्र सरकारकडे चेंडू ढकलून तुम्ही मोकळे होऊ शकणार नाही,” असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी  राज्य सरकारची कानऊघडणी केली.

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते

तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली. “वर्षानुवर्षे केंद्रात आणि राज्यात काँग्रेस पक्षाचे व त्यांच्या मित्रपक्षाचे सरकार होते. त्यावेळी मराठा आरक्षण का दिले नाही, याचे उत्तर अशोक चव्हाण यांनी आधी द्यावे. स्वातंत्र्यानंतर 6 मागास आयोगांनी मराठा समाज मागास नसल्याचा अहवाल दिला, तर तो त्या त्या वेळच्या काँग्रेसी सरकारांनी अधिकार वापरून का फेटाळला नाही, याचेही उत्तर अशोक चव्हाण यांनी द्यावे. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते म्हणून ते दिले नाही, हे स्पष्ट आहे,” असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तसेच पुढे बोलताना, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सरकारने घाईघाईत मराठा आरक्षण दिले हा अशोक चव्हाण यांचा आरोप चुकीचा आहे. भाजपा सरकारने आरक्षण दिले त्यानंतर दीर्घकाळ उच्च न्यायालयात सुनावणी झाली व नंतर सर्वोच्च न्यायालयातही बराच काळ भाजपा सरकारने मराठा आरक्षणाचा बचाव केला, असा दावासुद्धा त्यांनी केला.

दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलल्यानंतर राज्यातील भाजपने महाविकास आघाडी सरकारवर गंभीर टीका केली आहे. या आरोप प्रत्यारोपांमुळे मराठा आरक्षणाचं आगामी काळात नेमकं काय होणार ?, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इतर बातम्या :

मराठा आरक्षणासाठी अजूनही दरवाजा खुला, केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा: अशोक चव्हाण

Maratha Reservation Live | सुप्रीम कोर्टाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री

(Maharashtra BJP chief Chandrakant Patil criticizes mahavikas aghadi congress and Ashok Chavan on Maratha reservation)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.