
मुंबई, दि. 9 फेब्रुवारी 2024 | दहीसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. चार दिवसांत मुंबईत दोन गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा दिल्या आहेत. राज्यातील सर्व चिमुकल्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता बालवाडी ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला करत ही गाडी फोडली आहे. पुण्यातील खंडूजी चौकामध्ये हा प्रकार घडला आहे.
जळगावात मुलींचे फोटो काढण्यावरून तरुणांनी रिक्षाचालकाला चोप देत रिक्षाची तोडफोड केली. एका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून रिक्षाचालकाला तरुणांकडून बेदम चोप देण्यात आला. संतप्त तरुणांनी रिक्षाची तोडफोड करीत रिक्षा उलटवून दिली. रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेल्याने अनर्थ टळला. एमआयडीसी पोलीसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
कोण कोणाला कसं भेटतं हे बघितल्यावर सामान्य लोकांचे काम होत नाही हे दिसतं. काम गुंडागर्दी करणाऱ्यांचं होतं. जशी इलेक्शन जवळ येईल. तसं या गुंडांना सांगण्यात येईल. जे लोक भाजपचा विरोध करतायेत त्यांचा आवाज दाबा. येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला अशा अनेक गुंडांना बाहेर काढलं जाईल. लोकशाही दाबण्यासाठी भाजप त्यांचा वापर करेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पोलिसांना आम्ही सांगू गृहमंत्र्यांचा तुम्ही एवढा ऐकू नका त्यांना कार्यक्रमाला सोडून द्या. लोकशाही टिकवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी ही मदत केली पाहिजे. काही दिवसांपूर्वी गुंडांचा परेड काढली. मात्र त्या दुसऱ्याच दिवशी त्या गुंडानी रिल्स सुद्धा टाकल्या.. लोकांच सरकार आहे की गुंडांचा सरकार आहे. हे कुठेतरी सांगावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
विरारच्या न्यू विवा कॉलेज मध्ये 12वीतील विद्यार्थ्यांने सातव्या माळ्यावरून उडीमारून आत्महत्या केली आहे.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव गरू आणि डॉ. एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित केल्याबद्दल काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, मी त्याचे स्वागत करते.
11 राज्यांमधील 21 उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रीपद असंवैधानिक घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यांमध्ये जात आणि धर्माच्या आधारे उपमुख्यमंत्री पदांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा कॅनडात लपलेला दहशतवादी आणि गुंड अर्श डल्लाला भारतात आणण्याच्या तयारीत आहे. एनआयएच्या वतीने पंजाबमधील मोहाली येथील विशेष न्यायालयात यासंबंधीची याचिका स्वीकारण्यात आली आहे. आता एनआयए अर्श डल्लाला भारतात आणण्यासाठी पुढील प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू करणार आहे. इंटरपोलने 31 मे 2022 रोजी डल्ला विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
17 व्या लोकसभेचा उद्या शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लोकसभेत निरोप घेणार आहेत.
त्याचं आडनावच वाटोळ करणारा असे पाहिजे होतं, तो ज्या पक्षात जातो तो पक्ष मोडतो आणि आता तो ओबीसी बांधवांचे देखील नुकसान करणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे खासदारांसोबत जेवण केले. आज दुपारी संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवण घेतलं. राज्यातील खासदार हिना गावित यांनी मोदींसोबत जेवण केले. यावेळी 5 खासदार पंतप्रधान मोदींसोबत होते. जेवणावेळी सभागृहात मांडलेल्या श्वेत पत्रिकेबाबत मोदींनी चर्चा केली.
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करण्यात येणार आहे. तर शासनाच्या लाभांपासूनही वंचित ठेवण्याचा निर्णय सांगली जिल्हयातील नरवाड ग्रामपंचायतीने हा धाडसी निर्णय घेतला आहे.
पुणे पोलिसांच्या तंबीनंतर पण शहरातील गुन्हेगारांकडून रिल्स बनवणं सुरूच आहे. अनेक गुन्हेगारांकडून पुन्हा शहरात गुन्हेगारीला प्रोत्साहित करणारे रिल्स तयार करुन शेअर करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी संबंधीचे कुठलेही रिल्स शेअर करू नका अशी तंबी शहरातील सर्व गुन्हेगारांना दिली होती. यासाठी शहरातील गुन्हेगारांची परेड देखील पुणे पोलिसांकडून घेण्यात आली होती. पण तरीही शहरातील गुन्हेगार अजूनही असे रिल्स बनवून पुन्हा व्हायरल करत पोलिसांनाच चॅलेंज करत आहेत.
कल्याण नंतर कल्याण ग्रामीण भागात ही भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक झाली.कल्याण ग्रामीणच्या मलंगगड परिसरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बैठकीत उपस्थित होते. गणपत गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. लवकरच वरिष्ठांची भेट घेत आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांची दिली. वरिष्ठांना भेटल्याशिवाय माध्यमांशी बोलायचं नाही अशा प्रकारच्या वरिष्ठांच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दिवसाढवळ्या मुडदे पडताहेत लोकांना कायद्याचा धाक उरला नाही. कुठे आईची कुस रिकामी होतेय..तर कुठे लेकीबाळींच कुंकू पुसलं जात आहे. टील्ले पिल्ले चिथावणी देत सांगताहेत घाबरू नका आपला बॉस सागर बंगल्यावर आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
शिवसंकल्प अभियाना निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पालघर दौऱ्यावर जाणार आहेत. सायंकाळी 5 वाजता मनोर येथे शिव संकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. साडे सात वाजता पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथील महासंस्कृती महोत्सवात सहभागी होतील. रात्री 8.15 ला पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन करून, ठाण्याला रवाना होणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात राजधानी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुधे, सतीश कुलकर्णी उपस्थित असणार आहेत.
23 फेब्रुवारी रोजी मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा निघणार आहे. उशिरा लागणारे निकाल, ललित केंद्र प्रकरण, विद्यार्थ्यांचे वसतिगृह यांसारख्या प्रश्नावर मोर्चा निघणार आहे.
पिंपरी चिंचवड : शहरातील विविध विकासकामांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कासारवाडी भागात असलेल्या घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
वकील संरक्षण कायदा बनवा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील हजारो वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आहे मोर्चा. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचाही मोर्चामध्ये सहभाग..
मंगळवेढा तालुक्यातील मरवढे येथील उशिरापर्यंत सुरू ठेवलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि गाडी चालकावर ढाबा चालकासह सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी केला हल्ला केल्याची हैराण करणारी घटना घडली आहे.
आता जात फुटू देऊ नका. आता जात एक झाली आहे. मराठयांचा धसका घेतला म्हणून आरक्षण मिळले आहे. रायगडाचे दर्शन घेऊन आलो, पुन्हा जाणे होईल का नाही माहीत नाही, मरण आले तरी हरकत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आता आरक्षण विषय राहिला नाही. आता आरक्षण विषय संपत आला आहे. आता आरक्षण समजून सांगण्याची गरज नाही. सगे सोयरे शब्द ऐकायला सोपा आहे. मराठे शांततेत मुंबईमध्ये गेले आणि शांततेत आरक्षण घेऊन आले, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
अमरावतीच्या मार्डी येथील तथाकथित तवेवाला बाबा उर्फ सुनील कावलकर यास अटक. अमरावती ग्रामीण शाखेने केले शिताफीने जेरबंद. बलात्कारी स्वयघोषित या गुन्हेगारास अयोध्या व नंतर पाठलाग करत भोपाळ येथुन अटक,अमरावती गुन्हे शाखेची जबरदस्त कारवाई
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा झाली आहे. वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे. केंद्र सरकारकडून आज तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनाही भारतरत्न घोषित झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
आळंदी जळीत कांडमधील चार जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. स्पेसिफिक अलॉय कंपनीच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचे जीव गेले आहेत. कंपनी चार वर्षांपासून बंद असतानाही एका खोलीत ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आला होता. त्यालाच आग लागल्यानं ही दुर्घटना घडली, असं आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झालंय. म्हणूनच कंपनी मालकासह दोघांना याप्रकरणी जबाबदार धरण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
बीड- “सरकारने अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाविषय मार्गी काढावा. सरकारने अधिवेशन घेऊन अध्यादेशाचा कायद्यात रूपांतर करावा. ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा लढा अगोदर अभ्यास करून लढला. तसंच मराठा आरक्षण विषय मार्गी लागल्यास शेतकऱ्यांसाठी लढणार,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३७ एकर जाग संपादित केली जाणार आहे. आज पालकमंत्री अजित पवारांनी एअरपोर्ट अथॉरिटीसोबत बैठक घेतली. ६० टक्के निधी हा राज्य सरकार देणार तर ४० टक्के निधी हा पुणे महापालिका, पिंपरी महापालिका आणि पीएमआरडीए देणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय होणार आहे. आज सकाळी नवीन टर्मिनलची पाहणी करुन अधिकाऱ्यांसोबत त्यांनी ही बैठक घेतली.
संभाजीनगरमध्ये महायुती आणि मविआचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. गोळीबाराच्या घटनेवरून सरकारविरोधात मविआ आक्रमक झाली आहे.
कल्याण पश्चिमेतील धक्कादायक घटना… भर रस्त्यात असलेल्या गोल्ड फायनान्स बँकेसह दोन मेडिकल दुकानांमध्ये चोरी.. गोल्ड फायनान्स बँकेत सुरक्षा आलाराम असल्याने चोरीचा प्रयत्न फसला… मात्र चोरांनी बँकेच्या बाजूला असलेल्या दोन मेडिकल दुकानात चोरी करत मेडिकल मधील रक्कम प्राथमिक माहिती… कल्याण खडकपाडा सर्कल परिसरातील घटना महात्मा फुले पोलिसांचा तपास सुरू
इंडिया आघाडीबाबत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा अल्टीमेटम… जागा वाटपाच्या निर्णयात उशीर होत असल्याने केजरीवाल नाराज… 13 फेब्रुवारीला केजरीवाल आपला निर्णय जाहीर करणार… नितीश कुमार , ममता बॅनर्जी यांचानंतर अरविंद केजरीवाल यांचा इंडिया आघाडीला दे धक्का ??
मॉरिसच्या अनेक बॅनरवर ठाकरे गटाचा उल्लेख… मॉरिसला मोठं काम करण्याचं काम ‘सामना’तून…, राष्ट्रपती राजवट लावा असं सांगण्याचा ठाकरे गटाला अधिकार नाही… असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
घोसाळकरांवरील गोळीबाराला राजकीय रंग दिला जातोय… घोसाळकरांवरील गोळीबाराची घटना गंभीर.. राजकारण करणं योग्य नाही… असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे..
निखिल वागळे यांच्यावर गुन्हा दाखल… राष्ट्रपती,पंतप्रधान, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल… आज पुण्यात निर्भया बनो सभा या सभेला परवानगी देवू नये भाजपची मागणी… १५३ (अ), ५०० व ५०५ या कलामांतर्गंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
राष्ट्रपती,पंतप्रधान ,भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५३ (अ), ५०० व ५०५ या कलामांतर्गंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
आज पुण्यात निर्भया बनो सभा या सभेला परवानगी देवू नये अशी मागणी भाजपने केली आहे.
घरात काय भांडणं हे गृहमंत्री कसं सांगणार ? अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर छगन भुजबळांकडून फडणवीसांची पाठराखण.
गृहमंत्री फडणवीस सध्या अदृश्य आहेत. ते अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. जनता फडणवीसांकडे राजीनामा मागत आहे
गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. शिंदेंच्या टोळीत पोलीस आणि गुंड एकत्र आहेत. दीड वर्षांत फक्त गुंडगिरीच्या बातम्या येतात, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं.
राज्यात घडत असलेल्या गोळीबाराच्या घटनांवर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गृहमंत्री फडणवीस पक्ष फोडण्यात व्यस्त असल्याचे दमानिया म्हणाल्या
बुलढाण्यातील चिखली जालना मार्गावर बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे साउथ स्टाईल बॅनर लावण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी चर्चा झाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांकडूनही या प्रकरणाची माहिती घेतली.
पुण्याच्या शिरूरमध्ये एसटी महामंडळाच्या मालवाहू विमानाला भिषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शिरूरजवळ बोऱ्हाडे मळा येथे सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
काँग्रेसचे जुने नेते बाबा सिद्दकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेशांचे बॅनर झळकू लागले होते. बाबा सिद्दकी यांचा उद्या संध्याकाळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.
सासवडमध्ये इव्हिएम चोरीचा प्रकार समोर आला होता. EVM चोरीची घटना निवडणूक आयोगाने गांभिर्याने घेतली आहे, या प्रकणात चोरट्यांना अटक झाली असल्याचे अजित पवार म्हणाले.
माजी नगरसेवक अभिषेक घोळसेकर गोळीबार प्रकरणी विरोधक घटनांचं राजकारण करत आहेत अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली आहे.
कुणा गुंडांची मस्ती सुरु असेल तर पोलीस खाक्या दाखवावा लागेल. पुणे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांशी मी बोलणार असं अजित पवार म्हणाले.
घोसाळकर गोळीबार प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारी घटना. गोळीबाराची योग्य चौकशी होणार. विरोधकांकडून सरकारची बदनामी सुरु आहे असं अजित पवार म्हणाले.
19 फेब्रुवारील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात विमानतळाच्या नवीन टर्मिनलच उद्घाटन होणार आहे. अजित पवारांनी आज नवीन टर्मिनलची केली पाहणी. 60 हजार चौरस फूट एवढ नवीन टर्मिनलच क्षेत्रफळ आहे. 34 चेक इन काउंटर बनवण्यात आली आहेत. एक कोटी प्रवासी क्षमता या नवीन टर्मिनलची असणार आहे.
उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. 12 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे घेणार सभा. गंगापूर वैजापूर कन्नड आणि संभाजीनगर शहरात होणार सभा.
ठाकरे गटाच्या याचिकेवर 12 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात जो निर्णय दिला त्या विरोधात ठाकरे गट न्यायालयात
वसंत मोरेंकडून स्टेटसचा धडाका आहे. पुण्यात हातोडाच चालणार असे स्टेटस आज पुन्हा वसंत मोरे यांनी ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यास वसंत मोरे इच्छुक आहेत.
शिक्षक भरतीसदर्भात दिलासा देणारी बातमी आहे. पवित्र पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे पासंतीक्रम भरण्याची मुदत वाढवली आहे. आता १२ फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आहे. प्राधान्यक्रम भरून ते ९ तारखेपर्यंत लॉक करावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुण्यात आता ५८ ठिकाणी होणार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना होणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत. २५ ते ३० हजार वस्तीनजीक एक दवाखाना असावा अस उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यासाठी जागा भाडेतत्वावर घेतली जाणार आहे .
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहे. राज्यात एकूण ५१,१५२ प्राथमिक शाळा आहेत. त्यात ९५ लाख ६५ हजार एवढी पहिली ते ५ वी पर्यंतची विद्यार्थ्यांची संख्या आहे . २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षापासून याची सुरुवात होणार आहे.