Maharashtra News Omicron LIVE Update | राज्यात ओमीक्रॉनचे आणखी सात नवे रुग्ण, मुंबईत 3 तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 नवे रुग्ण
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या -

देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं बुधवारी तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, सैन्य दलाचे 11 अधिकारी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचे 10 रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. डोंबिवलीतील युवक ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्गातून मुक्त झाला . तर, पिपंरी चिंचवडमध्ये 6 आणि पुण्यात आणि मुंबईत 2 असे महाराष्ट्रात एकूण 10 रुग्ण आढळलेत. तर, राजस्थानमध्ये 9 रुग्ण आढळले आहेत. राजधानी नवी दिल्लीतही एक रुग्ण आढळून आला आहे. गोव्यातही ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
LIVE NEWS & UPDATES
-
नागपूर
एसटी संप ,
नागपूर विभागात संपात सहभागी 3 कर्मचाऱ्यांच आज निलंबन
आज 7 बस पडल्या आगार बाहेर
870 प्रवाश्यानी केला बस ने प्रवास
आता पर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 435
तर आता पर्यंत 32 कर्मचाऱ्यांची करण्यात आली बदली
-
पुणे
राज्यात ओमीक्रॉनचे आणखी सात नवे रुग्ण
मुंबई 3 तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 नवे रुग्ण
राज्यातील ओमीक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 17 वर
सातही रुग्ण परदेश प्रवास करून भारतात परतले
-
-
अहमदनगर
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची शिवसेना नेते मनीषा कायंदे यांच्यावर टीका
मी इथेच आहे कुठेच गेले नाही
मला महापौरांचा आदर आहे, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहे तरीसुद्धा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्तीने दखल घ्यावी अशी भूमिका मांडली त्याचे मी स्वागत करते
तुमच्यासारखे धडाकेबाज नेत्या आहे त्यामुळे चित्र वाघाची गरज तुम्हाला नाहीये
तर 14 वर्षे ज्यांना न्याय मिळत नाही, ज्यांनी बलात्कार केला त्यांच्यावर ती गुन्हा दाखल होत नाही,
त्यामुळे मीच आहे मी कुठे गेले नाही
ज्यांना आवाज नाही त्यांच्यासाठी चित्र वाघ, तुमचा आवाज मोठा आहे तुम्हाला गरज नाही
त्यामुळे माझ्या सारख्या छोट्या वर्गाची महापौरांना गरज असेल
तरी माझी गरज लागली तर मला सांगा मी यायला तयार आहे
-
सरसंघचालक मोहन भागवत भाषण
अण्णा भाऊ साठे यांच काम मोठ, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मलाही या कार्याबद्दल कळल
विवेकच्या या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने मला ही संधी मला मिळाली
अण्णा भाऊ साठे यांच्या काम मोठ
प्रामाणिकता हा महत्वाचा गुण महत्वाचा
यातला शतांश आमच्या पुढारी मंडळीपैकी आला तर देश कित्तेक पटीनं पुढे जाईल
प्रामाणिकता हा जन्मजात असावा लागतो
अण्णा भाऊ साठेप्रमाणेच सावकराच कर्तत्व
अण्णा भाऊ आणि सावरकर यांच्यात मला कसलाही फरक दिसत नाही
-
मुंबई
धारावीत ओमिक्रॉनचा एक रुग्ण सापडला
-
-
पुणे
ओमीक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन अलर्ट
जिल्ह्यातील ऑक्सिजनचा साठा वाढवण्यास सुरवात
प्रशासनाने 65 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे केलं नियोजन त्यापैकी 37 कार्यान्वित
साठवणुकीसाठीही 26 लिक्विड टँकचे नियोजन त्यापैकी 20 कार्यान्वित
-
नागपूर फायनल मतदान
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज 98.93 टक्के मतदान झाले.
एकूण 560 मतदार या निवडणुकीत होते.
मतदान संपेपर्यंत 554 मतदारांनी आपला मताधिकार बजावला.
एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते.
5 मतदारांनी मतदान प्रक्रीयेत सहभाग घेतला नाही.
-
वाशिम
अकोला - वाशिम - बुलडाणा स्थानिक स्वराज्य मतदार संघातील दुपारी 4 वाजेपर्यंत फायनल मतदान टक्केवारी 98.30 टक्के
822 पैकी 808 मतदारांनी केलं मतदान
-
बुलडाणा
विधान परिषद निवडणूकीत एमआयएम तटस्थ,
जिल्ह्यातील 6 मतदारांनी नाही केले मतदान,
मलकापुर नागरपरीषदेत 4, शेगांव मध्ये 2 असे एमआयएमचे संख्याबळ,
आगामी काळात एमआयएम स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठ्या जोमाने निवडणूक मैदानात उतरणार,
एमआयएम जिल्हाध्यक्ष शहज़ाद खान यांची माहिती
-
औरंगाबाद
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम काढणार उद्या मुंबईवर विराट मोर्चा
औरंगाबाद मधून सकाळी सात वाजता होणार मोर्चाला सुरुवात
राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोर्चासाठी येणार मुंबईत कार्यकर्ते
असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार विराट सभा
एमआयएम चे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची माहिती
मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही निघणार मोर्चा
मुंबईतल्या सभेचे ठिकाण एमआयएम कडून ठेवण्यात आले गोपनीय
देशातला भव्यदिव्य मोर्चा काढणार असल्याचे इमतियाज जलील यांचे स्पष्टीकरण
-
पुणे
राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यात कोणाबरोबरचं युती होणार नाही,.
पुणे महापालिकेसाठी 166 जागा रासप लढणार,
रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांची माहिती,
महादेव जानकर भाजपापासून फारकत घेणार ?
पुण्यात केली स्वबळाची घोषणा,
रासपच्या कार्यकर्त्यांचा घेतला मेळावा,
भविष्यात रासपा भाजपासोबत जाणार का ? महादेव जानकरांचे सूचक संकेत..
-
गडचिरोली
नगराध्यक्षा भाजपच्या योगिता पिपरे यांच्या अपात्रतेसंबंधी आदेश उच्च न्यायालयाने केले रद्दबातल
निवडणुकीला एक महिना शिल्लक असताना पिपरे यांनी पुन्हा एकदा वाजत-गाजत घेतला पदाचा कार्यभार
संपूर्ण बहुमत असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनीच मनमानी ठराव घेतल्याच्या तक्रारी करत पिपरे यांना केले होते अपात्र
नगरविकास मंत्रालयाने देखील दीर्घकाळ सुनावणी लांबवत ठेवत दिला होता अपात्रतेचा निर्णय
अखेर उच्च न्यायालयाने पिपरे यांना दिला दिलासा
चुकीच्या माहितीच्या आधारे नगरसेवकांनी तक्रारी केल्याचे पिपरे यांचे मत
-
सिंधुदुर्ग
परिवहनमंत्री अनिल परब यांच्याच जिल्ह्यात एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम
विलिनीकरण होइपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार
कारवाई झाली तरी बेहत्तर कर्मचाऱ्यांचा निश्चय
संपाचा आजचा 32 वा दिवस
या 32 दिवसात सिंधुदुर्ग विभागाचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान
प्रशासनाकडून 136 कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत निलंबन तर 144 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
एकूण 1995 पैकी 322 कर्मचारी हजर तर 1441 कर्मचारी संपात सहभागी
-
नाशिक
आदिवासी विकास महामंडळातील साडेतीनशे कोटींच्या नोकरभरती घोटाळ्या प्रकरणी दोन बड्या अधिकाऱ्यांसह भरती करणाऱ्या पुण्यातील खासगी कंपनीच्या विरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल
तत्कालीन प्रशासन अधिकारी नरेंद्र मांदळे, तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटी कंपनी चा समावेश
गुन्हे दाखल झाल्याने आदिवासी विभागात खळबळ
-
बुलडाणा
जिल्ह्यात 2 वाजेपर्यंत 140 मतदारांनी केले मतदान,
आता पर्यंत 38. 15 टक्के मतदान
-
अनिल परब
- एक संधी देत आहोत आम्ही. सर्वच कामगारांनी कामावर यावे. - कामावर जाताना अडवल्यास पोलिसांत तक्रार करू -सोमवारपर्यंत न आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.यात बडतर्फीही असेल -मेस्माची कारवाई सोमवारपर्यंत तरी होणार नाही. - २० डिसेंबरला तारखेला प्राथमिक अहवाल सादर करेल. परंतु १२ आठवड्यांनीच अंतिम अहवाल देईल - आतापर्यंत एसटीचे ५५० कोटींचे नुकसान - जे कामगार कामावर आलेत त्यांना नविन वेतनवाढ दिलीय - एसटी अत्यावश्यक सेेवेत येते. - कामगार आणि सदावर्ते यांच्यामध्येच वाद पहायला मिळतोय - सरसकट कामगारांची चुकी नाही. भडकवणारे उद्या निघून जातील, पण कर्मचारी पगाराविना राहतील
अनिल परब ऑन किरिट सोमेय्या
- किरीट सोमेय्यांनी यांनी नीट ऑर्डर वाचावी. त्यात माझे नाव नाहीय. माझे नाव टाकून सरकारला बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. मी त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय, लवकरच त्यांना माफी मागावी लागेल.
-
विलिनीकरणाचा मुद्दा हायकोर्टाच्या आदेशानं नेमलेल्या समितीसमोर : अनिल परब
गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या संघटनांकडून संप सुरु आहे. विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. त्या समितीनं अहवाल 12 आठवड्यात सादर करायचा आहे.
-
पिंपरी चिंचवडमधील ओमिक्रॉनचे चार रुग्ण बरे
कोरोनाच सावट असलं तरी कामांना 100 टक्के निधी दिला आमदार निधीत कपात केली नाही
ओमिक्रॉनच्या बाबतीत आपण ऐकतोय, मुख्यमंत्री ,राजेश टोपे आढावा घेतायेत,
जिल्ह्यात 1 कोटी 38 लाख लसीकरण झालंय, जिल्ह्यात पहिल्या डोसचं 100 टक्के लसीकरण पुर्ण झालंय,
पुण्यात 1 आणि पिंपरीत 6 आढळून आले होते,
त्यामधील पुण्यातील 1 निगेटिव्ह आलाय, जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज आहे
6 पैकी 4 जण निगेटिव्ह आलेत पिंपपरीतील रुग्ण
-
Ajit Pawar Live : 2022-23 साठी 793 कोटींच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी :अजित पवार
अजित पवार लाईव्ह :
आज सकाळी 9 वाजल्यापासून जिल्हा वार्षिक योजना 2022-23 या बद्दलची बैठक घेतली. कार्यकारी समितीची बैठक घेतल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक आमदार खासदार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर डोंगरी विकास संदर्भातील बैठक पार पडली. त्यानंतर कोरोना आढावा बैठक पार पडली.
जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भात साधारण 2022-23 साठी नियोजन विभागानं 619 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण योजना बसवण्याचा प्रयत्न केला आहे. 128 कोटी अनुसूचिता जातीसाठी तर एसटी साठी 45 कोटी 83 लाख रुपयं, अशा 793 कोटी 86 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिलेली आहे. 2021-22 जे आर्थिक वर्ष 2022 ला संपणार आहे. त्या जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. 795 कोटींची तरतूद होती त्यापैकी 41 टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. 31 मार्च पर्यंत उर्वरित रक्कम होईल, असं नियोजन सर्वांनी मिळून केलंलं आहे.
-
पुण्यातला ओमिक्रॉनचा रुग्ण बरा
पुण्यात फिनलंडवरून आलेल्या रुग्णाची ओमिक्रॉन टेस्ट निगेटिव्ह,
29 तारखेला ताप आल्यावर केली होती चाचणी,
ओमिक्रॉन चाचणी आली होती पॉझिटिव्ह,
10 दिवसानंतर आज रुग्णाला मिळाला डिस्चार्ज,
10 व्या दिवशी रुग्णाची टेस्ट आली निगेटिव्ह
-
कोरोना सकटांतर पीएमपीएमएल पुन्हा मालामाल
कोरोना सकटांतर पीएमपीएमएल पुन्हा मालामाल!
प्रवासी संख्या वाढल्याने उत्पन्नात भरघोस वाढ...
पीएमपीएमएलमधून दिवसाला 8 लाख प्रवासी करतायत प्रवास...
यातून दिवसाला 1 कोटी 35 लाख मिळतंय उत्पन्न...
पीएमपीएमएलच्या सुमारे 1500 बसेस धावतायत रस्त्यावर..
-
शाळा महाविद्यालयांसाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली कडक नियमावली
शाळा महाविद्यालयांसाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली कडक नियमावली
लस घेतली नसेल तर शाळा महाविद्यालयात नियमित करावी लागणार कोरोना चाचणी
लस घेतली नसेल तर दर सात दिवसाला कॉलेज मध्येच होणार कोरोना टेस्ट
एक लस घेतली असेल तर सर 15 दिवसाला केली जाणार कोरोना टेस्ट
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय
-
सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
सोलापूर:सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
पूर्णक्षमतेने अद्यापही बस सेवा सुरू नाही
एक दोन मार्गावरच धावत आहेत बस
त्यांच्याही वेळा निर्धारित नसल्यामुळे एसटीकडे प्रवाशांनी फिरवली पाठ
प्रवासासाठी खासगी वाहतुकीचा आधार
-
नागपुरात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
नागपूरात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यु,
रामसिंग सूर्यवंशी असं मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव,
प्रशासनानं बदली केल्याच्या धसक्यानं मृत्यु झाल्याची माहिती,
चालक पदावर होते कार्यरत,
संपाचा तिढा न सुटल्यानं कर्मचारी दडपणात
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात घेणार कोरोना आढावा बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात घेणार कोरोना आढावा बैठक,
ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर पुण्यासाठी आज काही नवीन नियमावली येणार का ?
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड , पुणे महापालिका आयुक्त, महापौर यांच्यासोबत घेणार एकत्रित बैठक,
तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही लावणार हजेरी !
-
गोंदिया महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
-महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गळफास लावून आत्महत्या......
-सालेकसा पोलीस स्टेशन येथे कार्यरत......
-मृत्यूचे कारण अद्यापही अस्पस्ट.....
-
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघ आता नौदलाला दूध पुरवठा करणार
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघ आता नौदलाला दूध पुरवठा करणार
नव्याने उत्पादित केलेला सिलेक्ट हा टेट्रापॅक नौदलातील सैनिकांना मिळणार
दोन लाख लिटर दूध पुरवठा करण्याबाबत गोकुळ दूध संघ आणि भारतीय नौदलामध्ये करार
टेट्रापॅकच्या 22 हजार लिटरची पहिली बॅच नौदल सेना कारवार याठिकाणी करण्यात आली रवाना
-
विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी मतदान, शिवसेना भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election) नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे.
Published On - Dec 10,2021 6:10 AM

छोट्या टॉप आणि जीन्समध्ये आलिया भट्ट, मोकळे केस, काळ्या गॉगलने वाढवलं सौंदर्य

भोजपुरी हॉटनेस क्वीनचा Sunday लूक पाहिला का?

Malaika Arora हिच्या ग्लॅमरस अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

virat kohli | विराट कोहली याचा धावण्याचा वेग उसेन बोल्टसारखा, किती वेगाने धावतो विराट

राघव यांच्यापेक्षा परिणीती हिची कमाई अधिक; किती आहे फरक?
