AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोलमाफी ते पीकविमा योजना, मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे सर्वांत मोठे 11 निर्णय!

Maharashtra Cabinet Decision Today : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने वेगवेगळ्या खात्यांशी निगडित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन आणि बंदरे विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे

टोलमाफी ते पीकविमा योजना, मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे सर्वांत मोठे 11 निर्णय!
eknath shinde and devendra fadnavis and ajit pawar
| Updated on: Apr 29, 2025 | 4:00 PM
Share

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने वेगवेगळ्या खात्यांशी निगडित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन आणि बंदरे विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. सरकारने याच मंत्रिमडंळाच्या बैठकीत सुधारित पीकविमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सरकारने ईलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर वाढावा यासाठी काही पावलं उचलली आहेत. सरकारच्या नव्या निर्णयाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना काही टोलनाक्यांवर टोलमाफी दिली जाणार आहे. सरकारने असे एकूण 11 वेगवेगळे निर्णय घेतले आहेत.

निर्णय क्रमांक 1

टेमघर प्रकल्प, ता. मुळशी, जि. पुणे येथील उर्वरित कामे व धरण गळती प्रतिबंधक कामासाठी रु.488.53 कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा)

निर्णय क्रमांक 2

मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम, 1951 अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियम, 1964 मधील नियम 27(ब) (3) मधील तरतूदीमध्ये सुधारणा. भिक्षागृहातील व्यक्तींना 5 रुपये ऐवजी आता 40 रुपये प्रतिदिन. 1964 नंतर प्रथमच बदल (महिला व बाल विकास)

निर्णय क्रमांक 3

PM-YASASVI या एकछत्री योजनेअंतर्गत ओ.बी.सी., ई.बी.सी. व डी.एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 2025-26 या वर्षांकरिता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय. (इतर मागास बहुजन कल्याण)

निर्णय क्रमांक 4

हडपसर ते यवत राज्य मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग व अस्तित्वातील रस्त्याचे सहापदरी बांधकाम करण्यास मान्यता. 5262.36 कोटी रुपयांचा मार्ग (सार्वजनिक बांधकाम)

निर्णय क्रमांक 5

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत महा इनविट (पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था) Maha InvIT (Infrastructure Investment Trust) स्थापन करण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम)

निर्णय क्रमांक 6

महाराष्ट्र राज्यात जहाजबांधणी व जहाजदुरुस्ती सुविधा (Shipyard)आणि जहाज पुनर्वापर सुविधा (Ship Recycling) विकसित करण्याबाबतच्या धोरणास मान्यता. (परिवहन व बंदरे)

निर्णय क्रमांक 7

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ ला मान्यता. (परिवहन व बंदरे).या निर्णयाअंतर्गत पॅसेंजर ईव्हीला सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह ईव्हीला काही टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचा ही निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या या नव्या धोरणाचं नवं प्रारूप काय असेल हे अद्याप समोर येणे बाकी आहे.

निर्णय क्रमांक 8

ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक (Aggregator) धोरण. (परिवहन व बंदरे)

निर्णय क्रमांक 9

सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवणार तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविणार (कृषी)

निर्णय क्रमांक 10

आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजबांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण)

निर्णय क्रमांक 11

11. म. रा. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण)

नितेश राणे यांनी दिली प्रतिक्रिया

आजच्या मंत्रिमंडळाने जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर यांच्याबाबत घेतलेल्या निर्णयानंतर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने घेतलेल ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत हातभार लावणार आहे. आजपासून महाराष्ट्राला स्वतंत्र शिप बिल्डिंग, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे. आपलं महाराष्ट्र पहिले राज्य असेल जे असं स्वतंत्र धोरण असलेलं राज्य असेल. इतर राज्य काम करताहेत. पण आपलं धोरण तयार झालं असून आज मान्यता मिळाली आहे. आपल्या राज्यात जहाज बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी मार्ग मोकळा झालाय. याआधी गुजरातमध्ये जास्त गुंतवणूक व्हायची. आता महाराष्ट्रात आपल्या राज्यात गुंतवणूक होईल. रोजगार निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.