Maharashtra Chiplun Landslide : चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीत ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे 17 जणांचा मृत्यू, खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली

चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे.

Maharashtra Chiplun Landslide : चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीत ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे 17 जणांचा मृत्यू, खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली
चिपळूणमधील पुराची संग्रहित दृश्यं
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 6:07 PM

चिपळूण : एकीकडे महाडचं तळीये गाव उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात 60 ते 70 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई इथं दरड कोसळलून 2 जण दगावले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खेडमधील धामणंदच्या दुर्घटनेनंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. (Landslide in Posare Boudhwadi in Chiplun and Dhamnand in Khed taluka)

चिपळूणमधील महापुरानं हाहा:कार माजल्याचं पाहायला मिळत आहे. पुरात अडकलेल्या जवळपास 1 हजार 800 लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. चिपळूणमध्ये एनडीआरएफच्या 4 टीम सध्या कार्यरत आहेत. लष्कर आणि नौदलाच्या 4 टीम चिपळूणमध्ये पोहोचत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. एअरफोर्सच्या 3 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सध्या बचावकार्य सुरु आहे. चिपळूणमधील कोविड रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

महाडमधील तळीये गाव उद्ध्वस्त

रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 38 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर आज दुपारी NDRFची टीम पोहोचली. तोपर्यंत ग्रामस्थांनीच 30 पेक्षा अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत.

दरम्यान, इतके तास होऊनही राज्य सरकारला या दुर्घटनेचा थांगपत्ताही नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपच्या काही आमदारांसह तळीये गावात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, असा सतांप तळीये गावातून प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला. प्रवीण दरेकर, भाजप आमदार गिरीश महाजन हे या गावात आहेत.

शासनाची अशी निगरगट्टी यंत्रणा आयुष्यात पाहिली नाही- प्रवीण दरेकर

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.

ही घटना मोठी आणि दुर्दैवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

Talai Landslide : महाडमध्ये माळीणची पुनरावृत्ती, काल दुपारी दरड कोसळली, आतापर्यंत काय काय घडलं?

Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?

Landslide in Posare Boudhwadi in Chiplun and Dhamnand in Khed taluka

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.