AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?

रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली. 35 घरातील 32 लोक जागीच मृत्यूमुखी पडले आहेत.

Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?
रायगडच्या तळईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 23, 2021 | 1:43 PM
Share

रायगड : रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली. 35 घरातील 32 लोक जागीच मृत्यूमुखी पडले आहेत. तर सुमारे 80 ते 90 लोकं ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील तळई गावात (Raigad Talai Village) ही भीषण दुर्घटना घडली. तळईवर दुखा:चं डोंगर कोसळला आहे.

तळईत दरड कोसळली, 32 लोकांचा जागीच मृत्यू , 80 ते 90 मातीखाली, नेमकं काय घडलं…?

काल संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. तुफान पावसामुळे ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. संध्याकाळच्या सुमारास तुफान पाऊस सुरु होता. याच पावसात तळई गावातील 35 घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत 32 लोकांचा जागीच मृत्यू झालाय तर 80 ते 90 लोकं मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याची भीती आहे.

दरड कोसळण्याची घटना कळताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 लोकांचे मृतदेह बाजूला काढले. पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण येत होता, अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली आहे. तर शासनाने लवकरात लवकर मदत पोहोचवावी, अशी याचना इथले ग्रामस्थ करत आहेत.

मदतीला उशीर का झाला?

ही घटना काल संध्याकाळी 4 च्या सुमारासची आहे. मात्र त्यावेळी दमदार पाऊस कोसळत होतो. त्यामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हेलिकॉप्टर ऑपरेशन शक्य नव्हतं. रोडही बंद होते. आता पावसाने उसंत घेतली आहे. आता एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

दुसऱ्या दिवशी एनडीआरएफ टीम पोहोचली, प्रवीण दरेकरांचा संताप

दरम्यान, काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. परंतु प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. आज सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून आता त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे. प्रशासन झोपलं आहे का?, असा संताप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. तसंच विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, अशा शब्दात तळई गावातून  दरेकरांनी आपला संताप व्यक्त केला.

80 लोक दबल्याची भीती

या दुर्घटनेत 80 लोक दबल्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. ही घटना मोठी आणि दुर्देवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असं दरेकर यांनी सांगितलं.

निगरगट्ट प्रशासन पाहिलं नाही- महाजन

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासकिय यंत्रणा घटनास्थळी पोहोचत नाही. घटनेला आता चोवीस तास होतील. मात्र अजूनही प्रशासनाकडून पाहिजे तेवढी मदत मिळत नाही. एवढं निगरगट्ट प्रशासन मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

संबंधित बातमी :

Raigad Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, तळई गावात भीषण दुर्घटना

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....