AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : कोणी इंधनाची साठेबाजी करत असेल तर… मुख्यमंत्र्यांच्या एका वाक्यात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, आता थेट…

Devendra Fadnavis : ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना डिझेल टंचाईचा फटका. अंबादास दानवे यांची फॉर्च्युनर घेऊन चालक तीन तास रांगेत उभा होता.

Devendra Fadnavis : कोणी इंधनाची साठेबाजी करत असेल तर... मुख्यमंत्र्यांच्या एका वाक्यात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, आता थेट...
Devendra Fadnavis
| Updated on: May 23, 2026 | 12:26 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन मुंबईवरुन शिर्डीला आले. शिर्डी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी आपल्या वंदे भारत ट्रेन प्रवासाचा अनुभव शेअर केलाच. पण सध्या राज्यात काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली. पेट्रोल पंपांवर रांगा दिसत आहेत. काही ठिकाणी वादावादी घटना घडल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री बोलले. “या संदर्भात मी कालच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते उपलब्ध करुन द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल, तर त्यावरही लक्ष ठेवा” असं मुख्यमंत्री म्हणाले.

“कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30 टक्के डिझेल, पेट्रोलची मागणी वाढली आहे. दरवर्षी किती डिझेल लागतं त्याची आपल्याला कल्पना आहे. अचानक 20 ते 30 टक्के मागणी वाढली असेल तर गडबड देखील असू शकते” असं मुख्यमंत्री म्हणाले. “शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी काही उपायोजना करायला सांगितल्या आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक द्वारे डिझेल देणं सुरु केलं आहे. आपणही तसं करण्याचा प्रयत्न करु” असं त्यांनी सांगितलं.

चाळीसगाव शहरातील रियलिटी काय?

रात्री एक वाजून 25 मिनिटांनी टीव्ही नाईन मराठीने चाळीसगाव शहरातील पेट्रोल पंपांवर रियालिटी चेक केली.चाळीसगावात डिझेल टंचाई तीव्र आहे. मध्यरात्रीही पंपांवर वाहनांच्या रांगा. शहरातील सहा पेट्रोल पंपांवरील पेट्रोल-डिझेलचा साठा संपला. कॅन घेऊन शेतकऱ्यांची पंपांवर गर्दी. रात्रीभर डिझेलसाठी प्रतीक्षा. नागदृढ वरील नायरा पेट्रोल संपावर लाईट्स बंद करून डिझेल वितरण सुरू असल्याचे निदर्शनास आले तसेच भडगाव रोड येथील जय शंकर पेट्रोल पंपावर कॅन मध्ये डिझेलचे वितरण केले जात होते. मात्र आमच्या प्रतिनिधींना पाहताच कॅन मधील वितरण थांबवून डिझेल संपले असे सांगण्यात आले.

अंबादास दानवे यांना डिझेल टंचाईचा फटका

ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना डिझेल टंचाईचा फटका. अंबादास दानवे यांची फॉर्च्युनर घेऊन चालक तीन तास रांगेत उभा होता. मध्यरात्री एक वाजता छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकातील एसपी पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी. चार चाकी व दुचाकी वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा. रात्री नऊ वाजता आलो होतो. मध्यरात्री एक वाजता डिझेल मिळतंय. अंबादास दानवे यांच्या चालकांनी दिली प्रतिक्रिया.

मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेलचे वाटप

छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील एचपी पेट्रोल पंपावर मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेलचे वाटप. मध्यरात्री एक वाजता पेट्रोल पंपावर गाडी आल्याने वाहनधारकांची झाली मोठी गर्दी. क्रांती चौकात रस्त्यावर लागल्या वाहनाच्या लांबच लांब रांगा.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ