Devendra Fadnavis : पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलले, म्हणाले…
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे, शरद पवार प्रचारात कुठे दिसत नाहीत? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. जे कार्यकर्ते आपल्यासाठी निवडणुकीत फिरतात, त्यांच्यासाठी आपण फिरायचं नाही, मदत करायची नाही हे योग्य नाही. त्यांना माहितीय या निवडणुकीत ते हरणार, म्हणून त्यांना पराभवाचा शिक्का माथी लावून घ्यायचा नाही"

“कोणी सत्तेत आहे, कोणी सत्तेबाहेर आहे यावरुन रेड ठरत नाही. एखादी तक्रार आली, आमच्या कार्यकर्त्या संदर्भात तक्रार आली तरी कारवाई होते. अनेक वेळ माझी देखील गाडी तपासली जाते. सत्ताधारी, विरोधक अशा कुठल्या गोष्टी यामध्ये नसतात” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही निवडणुका अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या मतदान आणि काल निवडणुका रद्द झाल्या. त्यामुळे कार्यकर्ते निराश झाले, यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. “निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीच आहे. अशा पद्धतीने कोणीतरी कोर्टात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “निवडणूक आयोग कुठला कायदा काढतय, कोणाचा सल्ला घेतय मला माहित नाही. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी बोललो, अशा पद्धतीने निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“निलंग्याच उदहारण घ्या, मी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी बोललो. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली. कोणा एकाचा फॉर्म रद्द झाला, तो कोर्टात गेला. कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला. ज्यांनी फॉर्म भरला त्यांना प्रचाराला पूर्ण वेळ मिळाला. कोणातरी पार्टी केलं होतं, म्हणून निवडणूक पुढे ढकलणं चुकीचं आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “निवडणूक घेण्याचा त्यांना अधिकार आहे. कायदेशीररित्या निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण चुकीच आहे. ज्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे गोष्टी केल्या. ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांच्यासाठी हे अत्यंत चुकीच आहे. आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन देऊ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोण नंबर 1 राहिलं?
“निवडणुका पुढे ढकलणं चुकीच होतं, नगरविकास विभागाचा यात संबंध नाहीय. हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. कलेक्टर्सनी त्यांचं मत मांडलं. त्यांनी घेतलेला निर्णय तो मान्य करावा लागेल पण तो निर्णय चुकीचा आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. भाजपने एक सर्वे केलाय, त्यानुसार 75 नगराध्यक्ष निवडून येतील असा प्रश्न एका पत्रकाराने विचारलं. त्यावर फडणवीस यांनी “असा काही सर्वे झाल्याचं आपल्याला माहित नाही. पण भाजप नंबर 1 चा पक्ष आहे. आमचे मित्र पक्ष त्या खालोखाल राहतील”
