बारामती शहरातील तब्बल 25 जणांवर मोक्का

नवीद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती : शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा जाधव याची 5 नोव्हेंबरला निघृणपणे हत्या करणाऱ्या 21 जणांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय खंडणी, दरोडे आणि जबरी चोऱ्या करत बारामती परिसरात धुमाकूळ माजवणाऱ्या धन्या कांबळे याच्या टोळीलाही मोक्का लावण्यात आला आहे. बारामतीत मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांचा 5 नोव्हेंबर रोजी भरदिवसा निर्घृणपणे …

, बारामती शहरातील तब्बल 25 जणांवर मोक्का

नवीद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती : शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा जाधव याची 5 नोव्हेंबरला निघृणपणे हत्या करणाऱ्या 21 जणांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय खंडणी, दरोडे आणि जबरी चोऱ्या करत बारामती परिसरात धुमाकूळ माजवणाऱ्या धन्या कांबळे याच्या टोळीलाही मोक्का लावण्यात आला आहे.

बारामतीत मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांचा 5 नोव्हेंबर रोजी भरदिवसा निर्घृणपणे खून करण्यात आला. याप्रकरणी 21 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 12 आरोपींना अटक केली असून त्यात चार अल्पवयीनांचा समावेश आहे. अन्य नऊ आरोपी फरार आहेत.

या सर्वांवर आज मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दिनेश रावसाहेब उर्फ पांडुरंग वायसे, विनोद शिवाजी माने, गणेश विठ्ठल माने, अनिल संभाजी माने, सुनील संभाजी माने, प्रेम दिनेश वायसे, अविनाश उर्फ अवी प्रदीप जाधव, संदीप दत्तू माने, गुलाब उत्तम माने, कुंदन उर्फ बाळा दत्तात्रय जाधव, सागर सुभाष शेळके, अविनाश उर्फ साड्या हनुमंत साडेकर, महेश विठ्ठल माने आणि अक्षय संजय भोसले अशी मोक्का लागलेल्यांची नावे आहेत.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडणी, जबरी चोरी, दरोडे अशा जबरी गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या धन्या उर्फ योगेश गोकूळ कांबळे, रोहित दादा जगताप, सचिन उर्फ बाज्या राजेंद्र काळे या चौघांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, विठ्ठल दबडे यांनी ही कारवाई केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *