AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update | नऊ दिवसात 34,105 रुग्णांना डिस्चार्ज, बाधितांचा आकडा 2 लाख 30 हजार 599 वर

राज्यात गेल्या नऊ दिवसात 34 हजार 105 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज कोरोनाच्या 4067 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

Maharashtra Corona Update | नऊ दिवसात 34,105 रुग्णांना डिस्चार्ज, बाधितांचा आकडा 2 लाख 30 हजार 599 वर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 10, 2020 | 12:25 AM
Share

मुंबई : राज्यात गेल्या नऊ दिवसात 34 हजार 105 रुग्ण बरे (Maharashtra Corona Virus Total Cases) होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.19 टक्के असून आज कोरोनाच्या 4067 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आज (9 जुलै) दिवसभरात 6 हजार 875 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 30 हजार 599 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असली तरीही कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Virus Total Cases).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दिवसभरात 4,067 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

राज्यात आज दिवसभरात 4 हजार 067 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 55.19 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात सध्या 93 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोमामुळे दिवसभरात 219 रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोमामुळे आज दिवसभरात 219 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईतीलच 68 रुग्णांचा समावेश आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर हा 4.19 टक्के एवढा आहे.

Maharashtra Corona Virus Total Cases

राज्यात 6 लाख 49 हजार 263 नागरिक होम क्वारंटाईन

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 12 लाख 22 हजार 478 नमुन्यांपैकी 2 लाख 60 हजार 599 नमुने पॉझिटिव्ह (18.86 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 49 हजार 263 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 48 हजार 191 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्ययावत आकडेवारी 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Virus Total Cases

संबंधित बातम्या :

Pune Corona | बिबवेवाडी ते दीनानाथ रुग्णालय जाण्यासाठी 8 हजार रुपये, रुग्णवाहिकेवर गुन्हा दाखल

वर्ध्यात नवरदेवाला कोरोना, वऱ्हाडी अमरावतीला परतले, क्वारंटाईनसाठी प्रशासनाची वरात

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...