
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अचानक दोन दिवस दिल्लीच्या विशेष दौऱ्यावर गेले. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दीड तास सखोल चर्चा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ पाहायला मिळाली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दिल्ली दौऱ्यामगाचे नेमकं कारण काय? याविषयी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे संसदेत दाखल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संसदेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेट झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी रिजिजू यांनी एकनाथ शिंदे यांना ‘श्रीकांत मेरा छोटा भाई है’, असे म्हटले. त्यांच्या संभाषणाची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नेमकी काय झाली चर्चा?
एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्याविषयी बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्रातील इतर देशांवर देखील चर्चा झाली. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. मी आधिवेशन सुरु असले की येत असतो. त्यामुळे आज तशाच प्रकारची भेट होती. सदिच्छा भेट होती. खासदार आहेत, आधिवेशन आहे त्यामुळे कोण टीका करतंय, कोण काय बोलतंय या पेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो.”
दीड तास पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा
पुढे एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट झाल्याचे सांगितले. जवळपास दीड तास त्यांची चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे याबाबत बोलताना म्हणाले, “या दरम्यान, मोदी साहेबांची भेट झाली. त्यामुळे विरोधक नेहमी त्यांचं काम करत असतात. टीका करण्याचं. मी माझं काम करत असतो. टीकेला कामाने उत्तर देण्याचे. अमित भाईंचे आणि आता जे काही पाच राज्यांच्या निवडणुका आहेत त्यांच्या बैठका सुरु आहेत. त्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांनी वेळ दिली तर भेटेनच ना.”