AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! विधानसभेत अखेर विधेयक मंजूर, सरकारचा मोठा निर्णय!

राज्य सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत मांडले होते. या विधेयकाला अखेर मंजुरी मिळाली आहे. आता या विधेयकानंतर आता महिलांनाही शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे.

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! विधानसभेत अखेर विधेयक मंजूर, सरकारचा मोठा निर्णय!
women farmers empowerment bill 2026Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2026 | 6:45 PM
Share

Womens Farmer Bill 2026 : पुरुषप्रधान संस्कृतीमुळे गाव खेड्यात राबणाऱ्या महिलांवर कायम अन्याय होत आला. शेतात राबणाऱ्या महिलांकडे कायम शेतमजूर म्हणूनच पाहिले जात होते. राज्यात महिलांच्या नावावर शेतजमीन असण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे राज्यात कागदोपत्री महिलांचा शेतकरी म्हणून ओळख मिळण्याचेही प्रमाण कमी आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता सरकारने सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यावेळच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 ला मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता राज्यातील महिला शेतकऱ्यांना कागदोपत्री शेतकरी महिला अशी ओळख मिळणार आहे.

महिला शेतकरी विधेयक मंजूर

सरकारने महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत मांडले होते. या विधेयकाला अखेर मंजुरी मिळाली आहे. आता या विधेयकानंतर आता महिलांनाही शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. आता फक्त पुरुष शेतकरी नसतील. तर शेतात राबणाऱ्या महिलांनाही महिला शेतकरी अशी ओळख मिळणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी एखादे सर्वसमावेशक धोरण असावे, यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून हे विधेयक आणण्यात आले. आता या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.

या विधेयकात नेमकी काय तरतूद?

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 मध्ये महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलांच्या नावे जमीन नसल्याने त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता ही अडचण येणार नाही. कुटुंबाची किंवा सामुदायिक शेती करणाऱ्या महिला मत्स्यव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यांसारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा प्रयत्न यातून केला जाईल. या विधेयकात राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधीचीही तरतूद आहे.

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळखपत्र

राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाईल. त्यांच्या हक्कांचे सरक्षण करण्याचा यातून प्रयत्न केला जाईल. भविष्यात शेतजमिच्या 7/12 वर महिलांचे नाव कसे येईल, यासाठी प्रयत्न केला जाईल.

Follow Us
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?