AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ आज विधानसभेत, फायदा काय होणार?

Women Farmers Empowerment Bill 2026: लाडक्या बहि‍णींसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला शेतकऱ्यांना आता कायदेशीर स्वतंत्र ओळख देण्यात येणार आहे. आज विधानसभेत 'महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' सादर होण्याची शक्यता आहे.

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, 'महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' आज विधानसभेत, फायदा काय होणार?
महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 02, 2026 | 12:15 PM
Share

Women Farmers Empowerment Bill 2026: राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी आज विधानसभेत ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ तयार करण्यात आले आहे.

‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकात’ काय?

राज्यातील कृषी क्षेत्रात ८१ टक्क्यांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. तरीही बहुतांश कृषी धोरणे व शासकीय योजना पुरुषकेंद्री आहेत.

कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्याने मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनांपासून वंचित राहतात.

कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला, तसेच मत्स्यव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यांसारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा प्रयत्न यातून केला जाईल.

कृषी क्षेत्रातील महिलांना ‘शेतकरी’ म्हणून वैधानिक मान्यता देणे, त्यांच्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणे, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठ व विविध सेवा महिलांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या विधेयकातून साध्य केला जाईल.

पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन, मधमाशी पालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग, बागायती, फुलशेती, मशरूम उत्पादन, कृषी वनीकरण, वनउपज संकलन अशा विविध उपक्रम तसेच भूमिहीन शेतकरी, भाडेकरू शेतकरी, शेतमजूर, चराई व्यवसाय करणारे आणि स्थलांतरित कृषी कामगार यांच्यासाठी विशेष व्यवस्था उभारली जाईल.

महिलांना राज्य शासनाच्या कर्ज योजना, कृषी अनुदाने, बियाणे, खते, पीक विमा, विस्तार सेवा, बाजारपेठ सुविधा, वाहतूक, साठवणूक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी डिजिटल प्रभावी यंत्रणा उभारली जाईल.

अजून महत्त्वाची तरतूद काय?

महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार केला जाईल.

महिला शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन केला जाईल.

जिल्हा आणि तालुका व गावस्तरापर्यंत मजबूत यंत्रणा असली पाहिजे. या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय देखरेख समिती केली जाईल.

राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे

असा होणार फायदा

7/12 वर महिलांचे नाव आणण्यासाठी प्रयत्न करणार

शेतातील सांख्यिकी आकडेवारीमध्ये स्त्री-पुरुष शेतकऱ्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात येईल

नमो ड्रोन दीदी योजनेतंर्गत ड्रोन पायलटचे प्रशिक्षण

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल

कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये महिलांना किमान ३० टक्के लाभ देण्यात येईल

पीएम किसान योजनेचा १८ लाख महिलांना लाभ मिळत आहे

‘लखपती दीदी’ आणि ‘शी मार्ट्स’ या माध्यमातून महिलांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणार

पशूपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालनासाठी विशेष अनुदान देण्याचा विचार

Follow Us
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं... कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने मोठी खळबळ
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क... धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...