Maharashtra Unlock | सोमवारपासून निर्बंध उठणार, आदेश जारी, कोणत्या टप्यात, कोणते जिल्हे अनलॉक? वाचा सविस्तर

पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे. (Maharashtra government Unlock guidelines)

Maharashtra Unlock | सोमवारपासून निर्बंध उठणार, आदेश जारी, कोणत्या टप्यात, कोणते जिल्हे अनलॉक? वाचा सविस्तर
lockdown

मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. यामुळे येत्या 7 जूनपासून पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. काल 4 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, अनलॉकसाठी कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे. (Maharashtra government Unlock guidelines)

🛑महाराष्ट्र अनलॉकची संपूर्ण माहिती🛑

💠अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार

  • पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे
  • दुसर्‍या टप्प्यात 2  जिल्हे
  • तिसरा 15 जिल्हे
  • चौथ्या टप्प्यात 8 जिल्हे

💠पहिल्या लेवलमधील जिल्हे

अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ

💠दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे

हिंगोली, नंदुरबार

💠तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे

मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम

💠चौथ्या लेव्हलमधील जिल्हे

पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग

🛑पाच लेव्हल कशा आहेत?🛑

💠पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

💠दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

💠तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

💠चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर

💠पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

कोणतं शहर कोणत्या टप्प्यात?

जिल्हा भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) पॉझिटिव्हिटी दर (टक्के)
पहिला टप्पा
अहमदनगर २४.४८ ४.३०
चंद्रपूर ९.३० ३.०९
धुळे ४.२५ २.५४
गोंदिया ६.३२ २.३७
जळगाव १५.१७ १.६७
जालना १७.६५ २.०५
लातूर १५.१३ ४.२४
नागपूर ८.१३ ३.८६
नांदेड ४.२८ १.९३
यवतमाळ १३.५८ ४.१९
दुसरा टप्पा
हिंगोली २९.३४ ४.३७
नंदुरबार २९.४३ ३.३१
तिसरा टप्पा
मुंबई उपनगर १२.५१ ५.२५
ठाणे १९.२५ ७.५४
नाशिक १८.७१ ७.७५
औरंगाबाद २०.३४ ५.३८
अकोला ४३.०४ ७.७४
अमरावती २८.५९ ६.५६
बीड ४७.१४ ८.४०
भंडारा ४.४१ ७.६७
गडचिरोली ५.९२ ६.५१
उस्मानाबाद ३१.०९ ७.७०
पालघर ४८.९३ ५.११
परभणी १६.०२ ७.१०
सोलापूर ४४.३९ ६.७८
वर्धा ४.०४ ७.५७
वाशिम १८.९० ५.१९
चौथा टप्पा
पुणे २०.४५ १३.६२
बुलडाणा ७.७१ १०.०३
कोल्हापूर ७१.५० १५.२५
रायगड ३८.३० १९.३२
रत्नागिरी ५१.८१ १६.४५
सांगली ४७.९४ १४.०१
सातारा ६१.५५ १५.६२
सिंधुदुर्ग ६६.५६ १२.७०

🛑काय सुरु राहणार?🛑

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने  सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल.  (Maharashtra government Unlock guidelines)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Unlock | महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, मध्यरात्री आदेश जारी

Special Report | महाराष्ट्रात 1 लाखांहून जास्त कोरोनाबळी, मुंबईसह कोणत्या शहरात किती मृत्यू?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI