AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा अपमान कोण करतंय याचं सर्टिफिकेट…मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?

"अशा वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. प्रजासत्ताक दिन साजरा करतोय त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य महत्त्वाचे आहे. सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे वक्तव्य इम्तियाज जलील किंवा कोणीही करू नये" असं जयकुमार गोरे म्हणाले.

महाराष्ट्राचा अपमान कोण करतंय याचं सर्टिफिकेट...मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?
jaykumar gore
| Updated on: Jan 26, 2026 | 12:13 PM
Share

“महाराष्ट्राचा अपमान कोण करतंय, याचं सर्टिफिकेट संजय राऊतांनी द्यायची गरज नाही. सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे वक्तव्य इम्तियाज जलील किंवा कोणीही करू नये” अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. “तंबाखू मुक्तीसाठी शासन काम करत आहे. त्यामुळे शासन अशी कारवाई करतेय. साताऱ्यात झालेली कारवाई याचे प्रतिक आहे. भविष्यात ड्रग्स विरोधात मोठी कारवाई करण्याचे शासनाचे धोरण आहे” असं साताऱ्यातील ड्रग्स कारवाई प्रकरणी जयकुमार गोरे म्हणाले.

संभाजी भिडे यांच्या विधानावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलणं टाळलं. ‘ते काय म्हणाले हे मी पाहिले नाही माहिती घेतो’ “अंधारेना समोर सगळा अंधार दिसत असल्याने काय सुरू आहे ते त्यांना समजत नाही. लोकांच्या भावना समजून, लोकं कोणासोबत आहेत ते समजून घेतले पाहिजे. जनाधाराचा आदर केला पाहिजे. सातत्याने निवडणुका झाल्या पाहिजेत, लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आणि त्या घेतल्यावर विरोधक त्याचा आदर करत नाहीत” असं जयकुमार गोरे म्हणाले.

असं किती दिवस धमकी देतायत

“लोकांनी दिलेल्या जनधाराचा स्वीकार केला पाहिजे. सुषमा ताई लोकशाही आणि संविधान मानत असतील तर त्या हा निकाल स्वीकारतील” असं गोरे म्हणाल्या. “सोलापूर-तिरुपती विमानसेवा लवकरच सुरू होईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत” अशी माहिती गोरे यांनी दिली. “ताईंना हलक्यात घ्यायचं नाही असं किती दिवस धमकी देतायत, ताईंना शुभेच्छा आहेत” असं गोरे म्हणाले.

फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही

“अशा वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. प्रजासत्ताक दिन साजरा करतोय त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य महत्त्वाचे आहे. सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे वक्तव्य इम्तियाज जलील किंवा कोणीही करू नये” असं जयकुमार गोरे म्हणाले.

टीका करणं गरजेचं नाही

“महाराष्ट्राचा अपमान कोण करतंय याचं सर्टिफिकेट संजय राऊतांनी द्यायची गरज नाही. आता पद्मभूषण जाहीर झालाय. त्यांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं, टीका करणं गरजेचं नाही. त्यांचे स्वागत त्यांनी केले पाहिजे” असं संजय राऊतांनी कोश्यारींवर केलेल्या टीकेवर जयकुमार गोरे म्हणाले.

मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.