AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : ग्रामपंचायत जिंकण्याचं स्वप्न अधुरं, रणधुमाळीत पाच उमेदवारांचा मृत्यू

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथील उमेदवार श्रीधर देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले (Hingoli Gram Panchayat Candidate Death)

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : ग्रामपंचायत जिंकण्याचं स्वप्न अधुरं, रणधुमाळीत पाच उमेदवारांचा मृत्यू
| Updated on: Jan 18, 2021 | 7:49 AM
Share

हिंगोली : ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल तोंडावर असताना हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत उमेदवाराचा मृत्यू झाला. श्रीधर देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निवडणुकांच्या रणधुमाळीत आतापर्यंत पाच उमेदवारांना प्राण गमवावे लागले आहेत. (Hingoli Gram Panchayat Candidate Death)

हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथील प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार श्रीधर देशमुख यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे देशमुख यांची प्राणज्योत मालवली. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येलाच उमेदवाराचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

रमेश घाईट हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे ते उमेदवार होते. शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा धक्का लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

सोलापुरात मतदानाच्या दिवशीच उमेदवार कालवश

सोलापुरातील सायबण्णा बिराजदार यांनी निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सकाळ-संध्याकाळ प्रचारात मग्न होते. पण हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तब्येत आणखी खालावल्याने मतदानाच्या दिवशीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरीतही उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू

प्रचारासाठी फिरताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना कालच समोर आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील धामापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार परशुराम शिगवण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामापूर ग्रामपंचायतीची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. परशुराम शिगवण हे गाव पॅनल वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवार होते. निवडणुकांचा प्रचार सुरु असताना शिगवण यांना हार्ट अटॅक आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान परशुराम शिगवण यांना प्राण गमवावे लागले. (Hingoli Gram Panchayat Candidate Death)

विजय शिवतारेंच्या बिनविरोध निवडलेल्या बहिणीचे निधन

पुरंदर तालुक्‍याचे माजी आमदार आणि माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची बहीण शोभा बाळासाहेब यादव यांचे 5 जानेवारीला पहाटे निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी सासवडमधील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने त्यांची प्राणज्योत मालवली. सटलवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निधनाच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मतदानाच्या दिवशीच उमेदवाराचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने गेला जीव

(Hingoli Gram Panchayat Candidate Death)

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.