Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्याचा कौल, कुणी चिंता करायची, कुणाला शाबासकी; महापालिकेसाठी कोण धोक्यात?

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्याचा कौल, कुणी चिंता करायची, कुणाला शाबासकी; महापालिकेसाठी कोण धोक्यात?

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निम्म्याहून अधिक निकाल लागले आहेत. (after gram panchayat election, what will happen in corporation election?)

भीमराव गवळी

|

Jan 18, 2021 | 7:55 PM

मुंबई: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निम्म्याहून अधिक निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. तर राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू असून रात्री उशिरापर्यंत सर्व चित्रं स्पष्ट होणार आहे. मात्र, गावगाड्याचा कौल आल्याने अनेक पक्षांची चिंता वाढली असून काहींवर तर महापालिकेतील सत्ता टिकवण्याचं संकट उभं राहिलं आहे. (after gram panchayat election, what will happen in corporation election?)

राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाजपने 2,203, शिवसेनेने 2,049, राष्ट्रवादीने 1,939, काँग्रेसने 1,531, मनसे 36 आणि इतरांनी 2,071 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. अजूनही 2,882 ग्रामपंचायतींचे निकाल लागायचे बाकी आहेत. त्यामुळे या सुमारे तीन हजार जागा कुणाच्या पारड्यात जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनेच जोरदार मुसंडी मारल्याचं चित्रं आहे. युती आणि आघाडीचा विचार केल्यास आघाडीने युतीपेक्षा प्रचंड यश मिळवलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

चिंता कुणाला?

गावगाड्याचा कौल आल्याने अनेक पक्षांची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षाचं यश भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर लढल्या जात नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीत कोणता पक्ष वरचढ ठरला हे तांत्रिक दृष्ट्या ठरवता येत नाही. पण उद्या येणाऱ्या पालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीची गणितं वेगळी असतात आणि जिल्हा परिषद, नगरपरिषदा आणि पालिका निवडणुकीतील गणितं वेगळी असतात. त्यामुळे आताच्या निकालावरून इतर निवडणुकींचा अंदाज काढणं योग्य नसल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही गावातील असते. गावात जवळपास सर्वच ओळखीचे असतात. नातेवाईक आणि भावकी असते. त्यामुळे आपसातीलच उमेदवार उभा केला जातो. त्यात बरीच राजकीय अंडरस्टँडिंग असते. त्यामुळे पंचायतीचे निकाल वेगळे येतात. त्याचं प्रतिबिंब इतर निवडणुकीत फारसं उमटत नाही. मात्र, राजकीय हवा निर्माण करण्यासाठी किंवा फसवा राजकीय भास निर्माण करण्यासाठी या विजयाचा वापर केला जाऊ शकतो, असं राजकीय निरीक्षक सांगतात.

यश कुणाचं?

ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाचं श्रेय कोणत्याही राजकीय पक्षांनी घेतलेलं नाही. अमूक नेत्यामुळे किंवा पक्षाच्या कामगिरीमुळे हे यश मिळालं असं कोणत्याही बड्या नेत्याने सांगितलेलं नाही. उलट हे यश स्थानिक कार्यकर्त्यांचं असल्याचं सर्वच नेत्यांनी म्हटलं आहे. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही यशाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या तिकिटावर लढवल्या जात नाहीत. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते पॅनल बनवून निवडणूक लढत असतात. तसेच या निवडणुकीत कोणताही बडा नेता प्रचारासाठी ही गेला नव्हता. नाही म्हणायला काही नेत्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. पण भाषणबाजी करणं, सभा घेणं, रॅली काढणं आदी प्रकार कुणीही केले नाही. त्यामुळे या निवडणुकीचे श्रेय कुणालाही देता येत नसल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

महापालिकेची चिंता वाढली?

औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या मतदारांचा काहीच रोल नसतो. त्यामुळे या महापालिकेतील राजकीय समीकरणावर पंचायत निकालाचा परिणाम होत नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच बाजूने जनतेने कौल दिल्याचं सांगून आपल्याच पक्षाची लाट कशी निर्माण झाली आहे, अशी हवा निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांना ग्रामपंचायत निकालाचा हत्यारासारखा वापर करता येऊ शकतो. पालिका निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या निकालाचे ढोल बडवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्याचा काही प्रमाणात राजकीय पक्षांना फायदाही होईल. पण पालिकेतील सत्तांतर करण्याएवढा हा मुद्दा महत्त्वाचा नसेल. त्यासाठी पालिकेतील समस्यांना घेऊनच राजकीय पक्षांना निवडणुकीचा प्रचार करावा लागणार आहे, असं राजकीय निरीक्षकांनी सांगितलं.

ग्रामपंचायत लिटमस टेस्ट

ग्रामपंचायत निवडणुकीचा पालिका निवडणुकीत फारसा प्रभाव पडत नसला तरी ग्रामपंचायत निवडणूक ही पालिका निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जात आहे. भाजपने ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढवली. तर महाविकास आघाडीने ही निवडणूक काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळावर लढवली. त्यातून महाविकास आघाडीला एकत्रित निवडणूक लढण्याने होणारे फायदे दिसून आले आहेत. तर भाजपला स्वबळावर निवडणूक लढवल्यास महाविकास आघाडीला कितपत टक्कर देता येईल याचा अंदाज आला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीला समोरे जाताना मनसे किंवा वंचितसारख्या पक्षांना एकत्र घेऊन जाण्याबाबत भाजपला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. नाही तर भाजपला पुढील निवडणुकाही जड जातील, त्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी लिटमस टेस्ट असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (after gram panchayat election, what will happen in corporation election?)

संबंधित बातम्या:

बीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरशी, जिल्ह्यात मनसेनेही खातं उघडलं, भाजपला मोठा झटका

सिंधुदुर्गात शिवसेनेला फक्त 21 जागा, पुढच्या निवडणुकीत ताकद यापेक्षा कमी होईल, नारायण राणेंचा दावा

“राज्यात भाजपचे 6 हजार सरपंच होणार”, चंद्रकात पाटलांचा दावा

(after gram panchayat election, what will happen in corporation election?)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें