AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Gram Panchayat Election Results 2021: धनंजय मुंडेंना ‘परस्पर सहमती’च्या संबंधांचा फायदा की तोटा?

राष्ट्रवादीचे नेते आणि समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. (dhananjay munde won 6 gram panchayat, no loss in election)

Beed Gram Panchayat Election Results 2021: धनंजय मुंडेंना 'परस्पर सहमती'च्या संबंधांचा फायदा की तोटा?
| Updated on: Jan 18, 2021 | 5:56 PM
Share

बीड: राष्ट्रवादीचे नेते आणि समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या सातपैकी एकच ग्रामपंचायत भाजपच्या वाट्याला आली आहे. ऐन मतदानाच्या तोंडावरच मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे टेन्शनमध्ये आलेल्या मुंडेंना मतदान प्रक्रियेकडे लक्षही देता आले नव्हते. मात्र, या कसोटीच्या काळात परळीतील जनतेने मुंडेंच्या हाती सत्ता देऊन त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे मुंडेंवरील आरोपांना परळीकरांनी गंभीरपणे घेतलं नसल्याचं राजकीय निरीक्षक म्हणणं आहे. (dhananjay munde won 6 gram panchayat, no loss in election)

परळीत रेवली, वंजारवाडी, लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपूर आणि भोपळा या सात ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडेच आल्या होत्या. उरलेल्या पाच ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी चार ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तर भोपळा ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे.

बीडमध्ये सेना राष्ट्रवादीचं वर्चस्व

बीडमध्येही ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्चस्व असल्याचं आढळून आलं आहे. बीडमधील 129 ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत. त्यापैकी 32 ग्रामपंचायती भाजपल्या जिंकल्या आहेत. 31 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. तर 39 ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.

परळीकर मुंडेंच्या पाठी खंबीर

ऐन मतदानाच्या तोंडावर मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले. त्यातच मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून त्यांच्या विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली. शिवाय त्यांना या परस्पर सहमतीच्या संबंधातून दोन मुले झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. मात्र, रेणू शर्मा या गायिकेने केलेले बलात्काराचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. मुंडेंवर अत्यंत गंभीर झाल्याने भाजपसह इतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे परस्पर सहमतीचं हे प्रकरण मुंडे यांना भोवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या आरोपामुळे परळीकर मुंडेंना नाकारतील असा कयास वर्तवला जात होता. साधारणपणे एखाद्या नेत्यावर असे काही आरोप झाल्यास मतदार त्या राजकीय नेत्याला नाकारतात. पण सात पैकी सहा ग्रामपंचायतींची सत्ता मुंडे यांच्या हाती देऊन परळीकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीच्या निकालातून मुंडे यांच्या मतदारसंघात त्यांच्या विवाहबाह्य संबंधांना थारा दिला गेला नसल्याचं दिसून आलं आहे.

सहानुभूतीची लाट?

दरम्यान, मुंडेंवर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांचा राजीनामा मागून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, परळीतील नागरिकांनी मात्र ‘डीएम जिंदाबाद’, ‘आम्ही डीएमच्या पाठी आहोत’, असं सांगत धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला होता. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडे यांच्यावर टीका होण्याऐवजी परळीत सहानूभूतीची लाट पसरली होती. ग्रामपंचायत निवडणुकीतील मुंडे यांचं यश हे त्याचंच प्रतिबिंब असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. मुंडे यांनी परळीत केलेली विकासकामे आणि कोरोना काळात केवळ धनंजय मुंडेच परळीकरांच्या मदतीला धावून आले होते. त्यांनी टेम्पो भरूनभरून शेतकऱ्यांचा वाया जाणारा भाजीपाला विकत घेऊन ग्रामस्थांना फुकटात वाटला होता. ग्रामस्थांच्या खाण्यापिण्याची ते स्वत: व्यवस्था करत होते. वाडी, वस्ती आणि तांड्यावर जाऊन लोकांची विचारपूस करत होते. त्याची जाणीव ठेवूनच परळीकरांनी मुंडेंच्या बाजूने कौल दिला असून या परस्पर संबंधाच्या प्रकरणाचा त्यांना एकप्रकारे राजकीय फायदाच झाल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत. (dhananjay munde won 6 gram panchayat, no loss in election)

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 (dhananjay munde won 6 gram panchayat, no loss in election)

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: मुनगंटीवारांना धक्का, एक ग्रामपंचायत वंचितकडे; अक्कलकोटमध्ये आठवलेंचे 34 उमेदवार विजयी

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 | ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे

मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती: नारायण राणे

(dhananjay munde won 6 gram panchayat, no loss in election)

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.