Solapur Gram Panchayat Election Results 2021: सोलापूरमध्ये राष्ट्रवादी पुन्हा, जिल्हाध्यक्षांच्या गावातच भाजपचा पराभव

Maharashtra gram panchayat election results 2021: सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक 213 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला असून भाजपच्या जिल्हाध्यक्षांना त्यांच्या गावातच पराभव स्वीकारावा लागला आहे.

  • रवी लवेकर, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर
  • Published On - 18:58 PM, 18 Jan 2021
Solapur Gram Panchayat Election Results 2021: सोलापूरमध्ये राष्ट्रवादी पुन्हा, जिल्हाध्यक्षांच्या गावातच भाजपचा पराभव
सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विजयोत्सव

सोलापूर: जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीच्या निकालांपैकी हाती आलेल्या निकालानुसार 654 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 213 तर भाजपनं 175 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या गटाचा सांगोल्यातील जवळा ग्रामपंचायतीत दारूण पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिपकआबा साळुंखे यांच्या गटाने 15 पैकी 11 वर विजय संपादित केला आहे. वासूद अकोले ग्रामपंचायतीवर भाजप तालुकाध्यक्ष केदार गटाने शेकापची पन्नास वर्षांची सत्ता उलथवून टाकत दणदणीत विजय मिळवला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 NCP won most Gram Panchayat in Solapur BJP lost in District President Village )

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांना महत्त्व असतं परंतु तालुक्याचे पक्षीय नेते त्या स्थानिक आघाडीचे नेतृत्व करत असतात. वासुद अकोला ग्रामपंचायती रूपाने सांगोल्यात भाजपाने पहिलीच ग्रामपंचायत जिंकली आहे.वासूद अकोला मध्ये मागील पन्नास वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाची एक हाती निर्विवाद सत्ता होती. मात्र, भाजप तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी ही सत्ता उलथून टाकत भाजपची सत्ता या ग्रामपंचायतीवर आणली आहे.

जिल्हाध्यक्षांच्या गावातच भाजपच्या गटाचा पराभव

जवळा ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या गटाचा दारुण पराभव झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या गटाने 15 पैकी 11 जागा जिंकत भाजप जिल्हाध्यक्ष यांना धोबीपछाड दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक ग्रामपंचायतीवंर विजय मिळवला आहे. त्या खालोखाल भाजपनं 175 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं 50 तर शिवसेनेने 97 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पक्षनिहाय ग्रामपंचायती

भाजप -175

शिवसेना -97

काँग्रेस -50

राष्ट्रवादी -213

स्थानिक आघाडी -87

आरपीआय -1

शेकाप -30

रा स प -1

सोलापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या:

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | ‘भाजपचा सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल’, चंद्रकांत पाटलांचा दावा

Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सत्ता गेली, बाळासाहेब थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला

(Maharashtra gram panchayat election results 2021 NCP won most Gram Panchayat in Solapur BJP lost in District President Village )